Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील 'इतक्या' विद्यार्थीनींंना सायकलसाठी मिळणार अनुदान

जिल्ह्यातील ‘इतक्या’ विद्यार्थीनींंना सायकलसाठी मिळणार अनुदान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत (Human Development Programmes) इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल ( Bicycles )दिली जाणार आहे.याचा लाभ जिल्ह्यातील २४०० विध्यार्थीनीना होणार आहे.यामध्ये सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, बागलाण व नांदगाव तालुक्यातील प्रत्येकी चारशे विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे.

- Advertisement -

करोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी सायकल देण्यात आल्या नाही.करोना संपल्यानंतर आता राज्य शासनाच्या नियोजन विभागाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायकल वाटपाचे आदेश दिले आहेत.या योजनेत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मात्र, शाळेपासून पाच किलो मिटर अंतरावर राहणार्याद गरजू मुलींना प्राधान्याने सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सायकल वाटप केले जाणार नसले तरी सायकल खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने (Secondary Education Department of Zilla Parishad) सुरु केली आहे. जिल्हा नियोजन अधिकार्यां कडे निधीची मागणी केली असून, त्यांनी मंजूरी दिल्यानंतर निधी वितरीत केला जाणार आहे.

…. असे मिळणार अनुदान

– पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात साडेतीन हजार रुपये करणार

– दुसर्या टप्प्यात त्यांनी सायकल खरेदी करावी

– सायकल खरेदी पावती दाखवल्यानंतर उर्वरित 1500 रुपये बँक खात्यावर जमा होतील

– या योजनेत शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल

– डोंगराळ व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या