Wednesday, June 26, 2024
HomeनाशिकNashik Sinnar News : दापूर येथे 'इतक्या' हजारांचा गुटखा जप्त; वावी पोलिसांची...

Nashik Sinnar News : दापूर येथे ‘इतक्या’ हजारांचा गुटखा जप्त; वावी पोलिसांची कारवाई

वावी | वार्ताहर | Vavi

- Advertisement -

तालुक्यातील वावी पोलीस ठाणे (Vavi Police Station) अंतर्गत येणाऱ्या दापुर (Dapur) येथील सम्राट किराणा दुकानात पोलिसांनी छापा (Raid) टाकत अवैधरित्या विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल करून अटक (Arrested) करण्यात आली आहे…

Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, दापूर येथे सोमवार (दि. १६) रोजी दुपारी तीन वाजता प्रशांत प्रभाकर आव्हाड (वय ३३) यांचे सम्राट किराणा दुकान नावाने व्यवसाय करत किराणा मालासोबतच अवैधरित्या दुकानात (Shop) शेजारील बंद खोलीत सुगंधी पान मसाला व गुटखा ठेवल्याचे समजताच वावी पोलिसांनी छापा टाकत केसरयुक्त विमल पान मसाला निळ्या हिरव्या रंगाचे गुटख्याचे ८८ पाकीट एकाची छापील किंमत व प्रत्येक पाऊचमध्ये ११ पाकीटे तंबाखू युक्त हिरा पानमसाला सुगंधी हिरव्या निळ्यापिवळ्या रंगाच्या ८८ पुड्या किंमत १९८ रुपये असा एकूण ३१ हजार ५०० रुपयाचा गुटखा जप्त (Sezied) करण्यात आला.

Nashik Crime News : सिन्नरमध्ये अवैध धंदे; पोलिसांकडून चार कॉफी शॉप उद्ध्वस्त

दरम्यान, मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या व बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या व मानवी जीवनास हानिकारक असणाऱ्या सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीरपणे वापर केल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य अधिसूचना ५२४ ७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अजय महाजन करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

- Advertisment -

ताज्या बातम्या