Saturday, October 5, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात महिनाभरात 'इतके' टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

Nashik News : जिल्ह्यात महिनाभरात ‘इतके’ टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

मशिनच्या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाने रेशनकार्ड धारकांना (Ration Card Holder) केवायसी करणे बंधनकारण केले आहे. जिल्ह्यात ७ लाख ९८ हजार ७०५ रेशनकार्ड धारक आहेत. त्यांचे केवायसी (KYC) महिनाभरात २७.१८ टक्के ई केवायसी पूर्ण झाली आहे. अजूनही ७० टक्क्याहून अधिक रेशनकार्ड धारकांची इ केवायसी बाकी आहे.

- Advertisement -

जिल्हयात ७ लाख ९८ हजार ७०५ रेशनकार्ड धारकांच्या माध्यमातून कुटूंबातील ३७ लाख ८ हजार २८२ सदस्याची इ केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा विभागापुढे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले होते. दि.१ जून ते दि. ४ जुलै या महिनाभराच्या कालवधीत १० लाख ७ हजार ७८७ रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण केली आहे. रेशनधारकांना ई केवायसी बंधनकारक केल्याने रेशन दुकानात नागरिक गर्दी करत आहेत. मात्र ई केवायसी मशीन अनेक दुकानात बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

ई केवायसी (E-KYC) बंधनकारक केल्याने नागरिक वेळ काढून रेशन दुकानात जात आहेत. अनेक दुकानात (Shop) रेशन घेताना थम होत आहेत. तर काही ठिकाणी ई केवायसी वेळी मशीन काम करीत नाही अश्या तक्रारी येत आहेत. केवायसी मशीनच्या कार्यप्रणालीच्या तक्रारी असल्याने केवायसीची प्रक्रिया जिल्हाभरात संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून (District Supply Department) ई केवायसी संदर्भात येणार्‍या तांत्रिक अडचणी विषयी मंत्रालयात संबंधित विभागाला पत्र पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ई केवायसी मशीन संदर्भातील तक्रारी संपण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पेठ तालुक्यात (Peth Taluka) सर्वाधिक ४४.६९ टक्के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी मालेगाव शहरामध्ये ७.४२ टक्के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रेशन वितरण होत आहे, मात्र केवायसीला तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे अनेक रेशन वितरण दुकानातील ई केवायसी प्रक्रिया ठप्प आहे.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

रेशन धारकांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. महिनाभरात जिल्हयात २७.१८ टक्के ई केवायसी पूर्ण झाली. ई केवायसी मशीन च्या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवण्यात येतील.

कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी) 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या