भोपाळ | Bhopal
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) यांनी भाजप आमदार इमरती देवी यांच्याविषयी ‘आयटम’ असा आक्षेपार्ह उद्गार काढल्याने मध्यप्रदेशातील राजकारण प्रचंड तापले आहे. या संपुर्ण प्रकरणात कमलनाथ यांनी आपल्या ‘आयटम’ या वक्तव्यावर खुलासा केला आहे.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपली बाजू मांडताना म्हंटले आहे की, “जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा यादीत नमुद होते की आयटम नंबर १, विधानसभेची यादी येते तेव्हा आयटन नंबर १, म्हणून आयटम हा शब्द कोणत्याही चुकीच्या भावनेने वापरलेला नाही. आयटम हा कोणताही अपमान करणारा शब्द नाही. मला त्या प्रसंगी यांचे नाव आठवले नाही. म्हणून मी बोललो की त्या इथल्या आमदार आयटम आहेत.
आयटम या शब्दाचा वापर साधारण असतो. आयटम हा संसदेचा शब्द आहे. हा शब्द नेहमी विधानसभेत येतो. आज आपण कोणताही प्रोग्राम पाहताना पाहतो तेव्हा आयटम शब्द सर्सासपणे वापरात येतो. म्हणूनच हा शब्द अपमान करणारा होत नाही. मला समजत नाही. पण त्यांना बोलण्यासारख काहीच नाही. सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही टीका
शिवराज सिंह चौहान हे अभिनेते आहेत. ते मुंबईत गेले तर मध्य प्रदेशचे नाव मोठे होईल. गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनयच करत होते. ही गोष्ट आता जनतेच्या लक्षात येईल, अशी टीका कमलनाथ यांनी केली. तसेच आज त्यांनी जनतेचा सामना करावा, आपल्या १५ वर्षांचा हिशोब द्यावा, किती मोबदला दिला, किती कर्ज माफ केले, किती रोजगार दिला याचा. सौदेबाजी आणि बोली लावून सरकार उभ केले आणि गद्दारी झाली. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मुर्ख समजतात. यांच्याकडे लोकांना सांगण्यासारख काहीच नाही असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते कमलनाथ ?
मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं काय नाव घेऊ, तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगलं ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं, ‘काय आयटम आहे’.”