धुळे dhule। प्रतिनिधी
पांझरा नदी पात्रातील पाणी आटल्यामुळे पांझरा काठावरील विंधन विहिरी व पाणी पुरवठ्याच्या योजना बंद (Water Supply Schemes) पडण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात वेळेवर विज पुरवठा (Power supply) होत नसल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची (drinking water) टंचाई भासत आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातील शिल्लक दोन हजार 592 दशलक्ष घनफुट जलसाठ्यातून साडेतीनशे दलघफु जलसाठा हा विसर्जीत करण्याची मागणी गेल्या 15 दिवसांपासून साक्री, धुळे, शिंदखेडा अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील शेतकर्यांनी केली परंतु जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) स्तरावर निर्णय घेण्यासाठी अधिकारीच नसल्याने पाणी सोडण्याचे आदेश देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातील आवर्तन सोडले नाही तर जबाबदार अधिकार्यांना (responsible authorities) दालनात कोंडणार (locked in the hall) असा इशारा प्रा.शरद पाटील यांनी दिला आहे.
अन् एकनाथांनी एकनाथांना लिहिले पत्र..
अक्कलपाडा धरण सन 2014 ला बांधून पूर्ण झाले आहे. या धरणात दरवर्षी 72 टक्के जलसाठा साठवण्यात येतो. व त्यानंतर जमा होणारा उर्वरित अतिरिक्त जलसाठा उजव्या-डाव्या कालव्याद्वारे शेतीला व लघु बांधार्यात सोडण्यात येऊन या पाण्याचा सदुपयोग करण्यात येतो. शिवाय टंचाईच्या काळात हरण्यामाळ, नकाणे, गोंदूर, निमडाळे,खार्याचे धरण भरण्यात येते. यंदा अक्कलपाडा धरणातील जलसाठ्याच्या उजव्या-डाव्या कालव्याशिवाय कुठेही आवर्तण न दिल्यामुळे सुमारे तीन हजार दशलक्ष घनफुट जलसाठा अद्यापही धरणात शिल्लक आहे. हे पाणी 15 जून नंतर पांझरा व कान नदीला पुर आल्यास सरळ समुद्रात सोडण्यात येते. म्हणून या पाण्याचा उपयोग प्रचंड उष्णतेच्या काळात पांझरा पात्रात सोडून धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्याच्या पांझरा काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याशिवाय इतर कामासाठीही होतो.
VISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच…
यंदा उन्हाळयाची तीव्रता प्रचंड असुन विहिरी आटायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पांझरा काठावरील अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजना या अल्पकाळच चालत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत आहे. शिवाय जनावारांनीही पिण्याच्या पाण्यासाठी हिंडावे लागत आहे.
दरवर्षी मे महिन्यात किमान दोन आवर्तने अक्कलपाडा धरणातून दिली पाहिजेत अशी ग्रामीण भागाची मागणी असते. मात्र यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनेक तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात.त्यामध्ये धुळे, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा पाणी सोडण्याचा प्रस्ताव, तहसिलदार साक्री,धुळे, शिंदखेडा व अमळनेर यांचा टंचाईचा प्रस्ताव, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे पाणी पट्टी भरणा रक्कम व ग्रामपंचायतीचे पाणी मागणीचे ठराव अशा तांत्रिक बाबी गटविकास अधिकारी मार्फत पुर्ण कराव्या लागतात.
धावत्या ट्रकला लागली आग अन् पुढे झाले असे काही….या कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव
त्यानंतर जिल्हाधिकारी, प्रधान सचिव जलसंपदा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देत असतात. असा आदेश आल्यानंतर पांझरा नदीवरील अनेक बंधार्यांच्या पाट्या काढण्यामध्ये व या पाट्या काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची तरतुद करावी लागते. नंतर पाणी सोडल्यानंतर ते आठ दिवसानंतर पांझरा पात्रात शेवटी कपिलेश्वर (तापी नदीच्या संगमापर्यंत) पर्यंत 45 कि.मी चा प्रवास करत पोहचते. मगच त्याचा फायदा शेतकर्यांना मिळतो.
दि.5 मे रोजी जिल्हाधिकारी धुळे यांना काही गावांच्या सरपचांना घेऊन निवेदन सादर केले होते. मात्र आज दि.17 रोजी पर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा रजेवर आहेत. पाणी सोडण्याची मागणी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग तसेच साक्री,शिंदखेडा व धुळे गट विकास अधिकार्यांना आदेश देण्यासाठी जबाबदार असणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील रजेवर गेल्या आहेत.
जळगावकरांनो पाणी जपून वापरा..सोयगाव तालुक्यातील जवान जम्मू येथून 13 वर्षापासून गायब
पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी खरीपाची व टंचाईची बैठक ऑनलाईन घेतली आहे. तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अश्विनी पवार या अगदी नवख्या आहेत.तर धुळे जिल्ह्यातील आमदार उन्हाळ्यात नेहमीप्रमाणे नजरेस पडत नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. अशात ग्रामीण जनता न्याय कुणाकडे मागणार? याबाबतही माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून स्वत: सीईओ बुवनेश्वरी, अप्पर जिल्हाधिकारी श्री. केकान, प्रभारी आरडीसी श्री.अंतुर्लीकर व पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता संजय पड्यार यांच्याशी सतत संपर्कात आहे. मात्र सर्व अधिकार्यांकडून नकारात्मकच उत्तरे मिळत असल्याने कोणत्याही क्षणी अधिकार्यांना दालनात कोंडण्याचा निर्णय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेतला असल्याची माहितीही प्रा.शरद पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.