Monday, June 24, 2024
Homeनगरसोशल मीडियावर डॉ. विखे यांची बदनामी; गुन्हा दाखल

सोशल मीडियावर डॉ. विखे यांची बदनामी; गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या व्हॉट्सप ग्रुपमधील लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेल्या एका मोबाईलनंबर धारक अनोळखी व्यक्तीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. विखे पाटील यांचे प्रचारक निखील बाबासाहेब वारे (वय 39 रा. शिलाविहार, सावेडी) यांनी तक्रार दिली आहे. निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या व्हॉट्सप ग्रुपवर लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेल्या (8669418271) या मोबाईलनंबर धारक अनोळखी व्यक्तीने डॉ. विखे पाटील यांची बदनामी करणारी खोटी व्हॉट्सप पोस्ट टाकली. यामुळे तक्रारदार, कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदार यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सदरचा प्रकार वारे यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून रविवारी (दि. 12) रात्री याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय शिरसाठ करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या