Tuesday, March 25, 2025
Homeनगरसोसायट्यांमधून पीक विमा भरता येणार

सोसायट्यांमधून पीक विमा भरता येणार

सहकार विभागाची माहिती || सीएससी केंद्राप्रमाणे कामकाज सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात जास्ती जास्त शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 खरीप हंगामचा लाभ घेता यावा, यासाठी आता सहकार खात्याने एक पाऊल पुढे टाकत विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधून पीक विमा रक्कम भरण्यास पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातून 794 सेवा सोसायट्यांना सीएससी केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून त्याठिकाणी आता शेतकर्‍यांना पीक विमा योजनेत सहभागी होत ऑनलाईन नोंदणीसह लाभार्थी हिस्सा भरता येणार आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी स्पष्ट केले की, प्रधानमंत्री पीक विमा योजना -2024 याअंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्याचे काम शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर सुरू झाले आहे. यासाठी 15 जुलै अंतिम मुदत आहे. या कामात आता सहकार विभागाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात 1 हजार 393 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून यापैकी 948 संस्थांची निवड सीएससी केंद्रासाठी करण्यात आली होती. मात्र, यातील 794 सेवा संस्था सीएससी केंद्रासाठी पात्र ठरल्या असून यातील 210 सेवा संस्थांचे काम देखील सुरू झालेले आहे. तर उर्वरित 584 संस्थांचे काम लवकरच सुरू होणार आहे.

यामुळे नगर जिल्ह्यातील 794 सेवा सोसायट्यांना सीएससी केंद्राचा दर्जा प्राप्त होणार असून त्याठिकाणाहून शेतकर्‍यांना पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. याठिकाणी शेतकर्‍यांना पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीसह लाभार्थी हिस्स्याची एक रुपयांची रक्कम भरता येणार आहे. याशिवाय शेतकर्‍यांनी संबंधीत सेवा संस्थांना अन्य कोणतेही शुल्क देवू नयेत, अथवा सेवा संस्थांनी देखील ते आकारू नयेत, असे आवाहन सहकार खात्याने केलेले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...