Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमसोलापूर रोडवर सराफला लुटले

सोलापूर रोडवर सराफला लुटले

60 हजारांच्या रोकडसह 1 लाखांचे दागिने तिघांनी पळविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुकानातील सोन्यांचे दागिने आणि रोकड असलेली बॅग घेवून दुचाकीवर नगरकडे येत असलेल्या सराफ व्यावसायिकास मोपेडवर आलेल्या 3 अनोळखी चोरट्यांनी रस्त्यात अडवून सत्तूरचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून घेत पळवून नेल्याची घटना गुरुवारी (दि.26) नगर-सोलापूर महामार्गावर कोंबडीवाला मळा परिसरात घडली.

- Advertisement -

याबाबत सराफ व्यावसायिक अंबादास फुंदे (रा. नारायणडोह, ता. नगर) यांनी शुक्रवारी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी फुंदे यांचे नारायणडोह गावात सराफी दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी ते दुकानातील सोन्यांचे दागिने तसेच दिवसभरात जमा झालेली 60 हजारांची रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज बॅगमध्ये ठेवून ते सदर बॅग घेवून दुचाकीवर नगरकडे येत होते. कोंबडीवाला मळा परिसरात आल्यावर अचानक एक मोपेड गाडी त्यांच्या दुचाकीला आडवी आली. त्या मोपेडवरून 3 अनोळखी इसम खाली उतरले.

त्यांनी फिर्यादी फुंदे यांना दमबाजी केली. तसेच सत्तूरचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्याच बरोबर त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मोपेडवर भरधाव वेगात नगरच्या दिशेने पसार झाले. याबाबत फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 3 चोरट्यांच्या गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...