Tuesday, September 17, 2024
Homeनगरघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम निकृष्ट

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम निकृष्ट

बेलापूर ग्रामपंचायतच्या विरोधी गटाचा आरोप, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

बेलापूर येथील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे सुमारे दीड कोटीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी 20 फूट खोल टाकी खचली असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे. मात्र, प्रवरा नदीला आलेल्या मोठ्या पुराचे पाणी सदरील प्रकल्पाच्या कामात घुसल्याने, या कामाची टाकी खचली असल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे. याबाबत विरोधी गटाचे सदस्य माजी सरपंच व विद्यमान सदस्य भरत साळुंके, रविंद्र खटोड, रमेश अमोलिक आदींनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. बेलापूर गावासाठी 73 लाख 56 हजार 254 आणि ऐनतपूर गावासाठी 72 लाख 69 हजार 293 रुपयाचा निधी फक्त सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आला आहे.

यासाठी जी टाकी होत आहे, तिचे काम तुम्ही म्हणता इष्टेमेंट प्रमाणे होत आहे, मग ही टाकी खचली कशी? 5 ते 6 इंच पाणी भरल्या गेल्यावर टाकी उलटी होते. त्यात तर अजून गावाचे पाणी जायचे आहे, तेव्हा ती फुटणार तर नाही ना? जलजीवन मिशन काम चालू असलेले सुमारे 126 कोटी रुपयांचे काम यात मोठा गैरव्यवहार होऊन कामात अतिशय तृटी आहे. काम ठरलेल्या इस्टिमेटप्रमाणे होत नसून पाईपलाईन ठरलेल्या इस्टिमेटप्रमाणे न घेता ही 1 ते 2 मीटर खोलच जमिनीत दबलेली आहे. गावातील विविध कामेही एकाच ठेकेदार मार्फत होत असून तीही अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे. त्यात रस्ते, गटारी, स्मशानभूमी सुशोभीकरण या कामात तफावत होत आहे. निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान टाकी खचल्याची माहिती मिळाल्यानंतर पं.समितीचे उपअभियंता श्री. पिसे यांनी पाहणी केली. यावेळी जि. प. माजी सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे आदी उपस्थित होते. सदर काम इस्टीमेट प्रमाणे होत आहे. परंतू पुराचे पाणी जोरात आल्याने सदरील कामाचा काही भाग खचला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच दुरुस्तीचे काम समाधानकारक पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारास बिल अदा केले जाणार नाही, असे सांगितले. सदर काम जिल्हा परिषद माध्यमातून पं.समिती स्तरावरुन होत असून या कामाचा कुठलाही निधी ग्रामपंचायतकडे वर्ग झालेला नाही. अथवा बिल ग्रामपंचायतीकडून अदा केले जाणार नाही, असे आश्वासन श्री. पिसे यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या