आजच्या दिवशी १९ वर्षापूर्वी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला घडला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दोन्ही हल्ल्यांमध्ये मिळून २,७५३ लोक मारले गेले. पेंटागॉनमधील हल्ल्यामध्ये १८४ लोकांचा बळी गेला तर पेन्सिल्व्हेनिया राज्यातील शँक्सव्हिले गावाजवळ कोसळलेल्या विमानातील प्रवासी आणि कर्मचारी मिळून ९३ लोक मारले गेले.
९/११ ला आता जवळजवळ दोन दशके झाली असतील पण तो हल्ला अविश्वसनीय क्रूर धाडसीपणामुळे कुतूहलाचा विषय आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेवर त्याचा काय परिणाम झाला आणि त्यामागील सूत्रधार अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला दशकभरानंतर शोधून ठार मारण्यात आले. यावर काही चित्रपट देखील बनले. आपण जाणून घेऊयात ते चित्रपट.
अमेरिकन ईस्ट (AmericanEast)
डीसी ९/११ : टाईम क्रीसिस (DC 9/11: Time of Crisis)
९/११ (9/11)
द ९/११ कमिशन रिपोर्ट (The 9/11 Commission Report)
फ्लाईट ९३ (Flight 93)
वर्ल्ड ट्रेड सेंटर २००६ (World Trade Center 2006)