Wednesday, October 30, 2024
Homeशब्दगंधकाही प्रेक्षणीय स्थळे

काही प्रेक्षणीय स्थळे

– अंजली राजाध्यक्ष

१) धनकर मॉनेस्टरी – येथे काही जुन्या श्रद्धा आहेत. त्यानुसार धनकर गाव एखाद्या कमळाप्रमाणे हिमराजीत वसलेले आहे. या कमळाच्या पाकळ्या म्हणजे वेगवेगळ्या दिशेने पसरलेले आठ डोंगर.. त्यांना नावे आहेत. हे पर्वत स्थानिक लोकांच्या देवतांचे स्थान असल्याचे मानतात. स्पितीचा पहिला राज्यकर्ता राजा निमागॉन आणि त्याचा मुलगा डिचोक गॉन यांनी धनकर किल्ल्याची स्थापना केली. राज्याचे व्यवहार किल्ल्यांवरून होत आणि धार्मिक व्यवहार मॉनेस्टरीमधून होत.

- Advertisement -

2) गियू नाला येथील बुद्धिस्ट ममीबद्दल – संगा तब्जीन हे बौद्ध भिक्षूक होते. ज्या बौद्ध स्तुपात ते ध्यानाला बसत तो स्तुप 1975 सालच्या भूकंपात गाडला गेला. 1981 सालच्या उत्खननात भारत-तिबेट सीमा पोलिसांना याचा शोध लागला. सन 2002 मध्ये यूएसएमधील कॅलिफोर्नियाच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मम्मीवर रिसर्च करण्यात आले. कार्बन डेटिंगच्या सहाय्याने त्यांनी हा शोध लावला की, ही ममी चौदाशे तीस सालची असावी. आम्ही या ममीचे फोटो काढले आहेत.

3) कोमिक – जगातले सर्वात उंचावरचे खेडे व तेथे नेणारा सर्वात उंचीवरचा मोटरेबल रोड. हे सर्व पाहण्याचा दुर्मिळ योग आला. विविध रंगांची छोटी छोटी धाब्याची घरे आम्ही पाहिली व त्यांचे फोटोही काढले. हिवाळ्यात ही सर्व बर्फाच्छादित होती हे आमचे टूर लिडर साने यांनी सांगितले.

4) हिक्कीम – जगातले सर्वात उंचीवरचे हे पोस्ट ऑफिस. सर्वात उंचीवरील रोडवरून आम्ही सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आलो व तेथून आपापल्या घरी पोस्ट कार्डस्ही पोस्ट केली. पर्यटन काळ असल्याने अनेक उत्साही पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. इच्छुकांना पोस्ट कार्ड पाठवायचे असल्यास पत्ता देते.. हिक्कीम पोस्ट ऑफिस.

सर्वोच्च उंचीवरचे पोस्ट ऑफिस

कोमिक गाव

झळप लेवश – 172 114

हिमाचल प्रदेश

5) जेओरी येथे गरम पाण्याचे कुंड लागले. उनू महादेव तीर्थ म्हणून ही जागा ओळखली जाते.

6) सांगला व्हॅलीमध्ये गरूड गंगा असे ज्याला म्हणतात, ते नैसर्गिक पाण्याचे झरे (खरे मिनरल वॉटर) म्हणतो तेथे गेलो. हे एक धार्मिक क्षेत्र आहे व गंगेचे पाणी व तीर्थ म्हणून आम्ही येथील पाणी भरून घेतले.

क्रमशः

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या