Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजावयाचा मावस सासूवर प्राणघातक हल्ला

जावयाचा मावस सासूवर प्राणघातक हल्ला

वणी | वार्ताहर Vani

- Advertisement -

पत्नीस सासरी पाठवत नाही व पत्नीला भेटावयास आलेल्या पतीने रागाच्या भरात मावस सासूवर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून सदर महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.

दत्तात्रय बाजीराव इकडे (३२, रा. नांदूरमधमेश्वर, ता. निफाड) वणी येथील कड गल्ली येथे पत्नी अक्षरा ही चार महिन्यांची बाळंतीण असून तिला भेटायला आला होता. त्यावेळी हल्लेखोर दत्तात्रय त्याची सासू संगीता व मावस सासू मंगला यात पोरीला सासरी होणार्‍या नवर्‍याच्या त्रासाबाबत दत्तात्रय यास जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. यावेळी हल्लेखोर दत्तात्रयने राग येऊन मंगलावर घरातच चाकूने प्राणघातक हल्ला करत मंगला यांच्या मानेवर व खांद्यावर चाकूने वार केले व तेथून पोबारा केला.

त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यास हातात चाकू घेऊन पळताना बघितले असता त्यातील काही लोकांनी त्याचा पाठलाग करत त्यास सिनेस्टाईल पकडले व घटनास्थळी आणले. यावेळी त्याने हातातील चाकू पळताना फेकून दिला होता.

पोलिसांना कळवले असता पोलिसांनी लागेच येत हल्लेखोरास ताब्यात घेतले. तत्पूर्वी हल्ल्यानंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखत जखमी मंगलास तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांस अतिरक्तश्राव झाल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. वणी पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे.

ताज्या बातम्या

संभाजी

एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गैरकारभारावरुन राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार...