Saturday, June 13, 2026
HomeनगरCrime News : जावयाला सासर्‍याकडून मारहाण

Crime News : जावयाला सासर्‍याकडून मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पत्नीला व्यवस्थित नांदवत नसल्याच्या कारणावरून जावयाला सासरे आणि चुलत सासर्‍याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल रवींद्र गरूड (वय 28, रा. विघ्नहर्ता कॉलनी, बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोलेनाथ शंकर आडबल्ले (रा. नवनागापूर, अहिल्यानगर) व दिगंबर शंकर आडबल्ले (रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी विशाल गरूड हे भोलेनाथ आडबल्ले यांचे जावई असून, दिगंबर आडबल्ले हे त्यांचे चुलत सासरे आहेत. 27 मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिगंबर आडबल्ले यांनी विशाल गरूड यांना बोलण्यासाठी नवनागापूर येथे येण्यास सांगितले. त्यानुसार ते तेथे गेले असता भोलेनाथ आडबल्ले यांनी तू माझ्या मुलीला व्यवस्थित का नांदवत नाहीस? असा जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर संतापलेल्या भोलेनाथ यांनी फिर्यादीला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच माझ्या मुलीला त्रास दिलास तर तुला पाहून घेईन, अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या