Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमसासुरवाडीकडील लोकांची जावयाला मारहाण

सासुरवाडीकडील लोकांची जावयाला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गाय विकलेले पैसे पत्नीला दिले नाही म्हणून सासुरवाडीकडील लोकांनी जावयाला शिवीगाळ करून लोखंडी टामी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली. किरण कारभारी मकासरे, (वय 30 वर्षे), रा. मानोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मी दि. 7 जानेवारी 2025 रोजी माझी संकरीत (जर्सी) गाय एका व्यापार्‍याला 41 हजार रुपयांना विकली. ते पैसे मी पत्नीला दिले नाही म्हणून पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांना बोलावून घेतले. त्यावेळी किरण मकासरे यांचे सासरे, सासू, मेव्हणा, मेव्हुणी आदींनी किरण मकासरे यांच्या घरी येऊन त्यांना म्हणाले, तू गाय विकून आणलेले पैसे माझ्या मुलीला का नाही दिले, ते पैसे आताच्या आत्ता दे, असे म्हणून आरोपींनी मकासरे यांना शिवीगाळ करून लोखंडी टामी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील 41 हजार रुपये व मोबाईल काढून घेतला.

- Advertisement -

किरण कारभारी मकासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी प्रिया किरण मकासरे, रा. मानोरी, ता. राहुरी, तसेच सासरे किरण महादू कांबळे, मेव्हणा विकी किरण कांबळे, मेव्हुणी स्विटी किरण कांबळे, सासू ज्योती किरण कांबळे, सर्व रा. वॉर्ड नं. 1 गोंधवणी, ता. श्रीरामपूर व तीन ते चार अनोळखी इसम यांच्यावर गु.र.नं. 17/2025 भारतीय न्याय संहिता कलम 352, 351 (2), 191 (3), 191 (1), 189 (2), 119 (1), 118 (1), 115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...