Monday, June 24, 2024
Homeक्राईमदारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने केली बापाची हत्या

दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने केली बापाची हत्या

जामनेर – प्रतिनिधी jamner
शहरालगत पळसखेडा बुद्रुक येथील वसंत लीला नगर येथे राहणाऱ्या बाजीराव पवार वय 58 या खाजगी वाहन चालकाची त्याच्याच दारुड्या अविवाहित तरुण मुलाने बापाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून धारदार चाकूने मानेवर वार करून निर्गुण हत्या केली. तालुक्यातील आठ दिवसातील ही सलग दुसरी घटना असून आरोपी मुलगा बाजीराव पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

आज दि.16 मे सायंकाळी 4:45 वाजेच्या दरम्यान त्यांचा अविवाहित तरुण व्यसनाधीन मुलगा सुमित हा दारूच्या नशेत घरी आला. बाप बाजीराव पवार याने पैसे देण्यास नकार दिला असता सुमितने खिशातून चाकू काढून धारदार शास्त्राने बापाच्या मानेवर वार केले. बाप बाजीराव अशा अवस्थेत शंभर दीडशे पावलं चालत थोडा झाडाखाली बसला. तेथेच त्याला चक्कर येऊन तो कोसळला. आजूबाजूचे लोक धावले व बाजीराव यास रिक्षातून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपचारासाठी आणत असतानाच बाजीराव याचे निधन झाले.

सुमितच्या त्रासाला कंटाळून त्याची आई व बहीणही बाहेरगावी निघून गेले होते. या घटनेने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणे केली व पंचनामा करून आरोपी मुलास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या