Saturday, July 27, 2024
Homeनगरसोनईतील ‘त्या’ गल्लीचा पत्रे लावून संपर्क बंद

सोनईतील ‘त्या’ गल्लीचा पत्रे लावून संपर्क बंद

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनई येथील एकाचा मृत्यू झाल्यानंतर व त्यानंतर दहा जण करोना संक्रमित आढळून आल्यानंतर सोनईत लॉकडाऊन सुरू झाले असून ती व्यक्ती राहत असलेल्या गल्लीचा संपर्क बंद करण्यात आला असून या गल्लीतील लोकांना काही स्वयंसेवकांनी भाजीपाला व दुधाचा पुरवठा केला. तर तेथीलच एक दुकान तात्पुरते उघडून किराणा उपलब्ध केला.

- Advertisement -

गेले दोन दिवस सोनईतील काही गल्लीतील रहिवाशांकडे इतर लोक संशयाने पाहत होते. त्यांना कोणी किराणा, दूध, भाजीपालाही विकत देत नव्हते. सोनईतील ते कुटुंब व त्यांच्या नातेवाईकाचे कुटुंब यांच्याबद्दल ग्रामस्थ व महिला प्रचंड नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

दरम्यान या दोन्ही कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या 102 व्यक्तींना प्रशासनाने एका शिक्षण संस्थेत क्वारंटाईन केले असून तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राने वेगवेगळ्या गोळ्या नेऊन ठेवल्या आहेत तसेच येथे सर्वांची भोजन व निवासव्यवस्था स्थानिक कार्यकर्त्याकडून उत्तमप्रकारे केली जात असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. रविवारी या 102 जणांचे स्त्राव तपासणी अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु सायंकाळपर्यंत अहवाल आले नाहीत.

पॉझिटिव्ह 10 मधील एकजण सोनईच्या शोरूम कार्यालयात युवा नेत्याला भेटून गेला होता. म्हणून या युवा नेत्याने स्वतःहून नगरमध्ये जाऊन खाजगी तपासणी करून घेतली असून युवा नेते व त्यांच्या 2-4 समर्थकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या