Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमAhilyanagar : सोनई, भिंगारमध्ये गुटखा-तंबाखूविक्रीवर एलसीबीचे छापे

Ahilyanagar : सोनई, भिंगारमध्ये गुटखा-तंबाखूविक्रीवर एलसीबीचे छापे

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त || चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. सोनई आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (14 ऑगस्ट) टाकलेल्या दोन स्वतंत्र छाप्यांमध्ये सहा लाख 48 हजार 510 रूपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चार संशयित आरोपींविरूध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर दोघे पसार आहेत.

- Advertisement -

एलसीबी पथकाने सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत पाच लाख 58 हजार 510 रूपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली. या प्रकरणी यश मनोज नहार (वय 25, रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अजित हनुमंत पवार (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड) हा पसार आहे. त्यांच्याविरूध्द सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दुसर्‍या कारवाईत 90 हजार रूपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

या प्रकरणी इंतुभाई उर्फ इंतिखाबआलम अब्दुस्सलाम सैन (वय 50, रा. मुकुंदनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा साथीदार जितू मालपाणी उर्फ चांडक (रा. छत्रपती संभाजीनगर) हा पसार आहे. त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, भगवान सानप, राहुल डोके, रणजीत जाधव, अमृत आढाव, अतुल लोटके, निळकंठ कारखेले, अमोल आजबे, रोहित मिसाळ, प्रकाश मांडगे आणि अरूण मोरे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...