Monday, May 27, 2024
Homeनगरसोनई परिसरात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव

सोनई परिसरात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई व परीसरात सध्या डेंग्यूचा फैलाव अधिक वाढतो आहे. गेल्या काही दिवसात डेंग्यूसदृश आजारामुळे सोनईतील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

- Advertisement -

ही वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परीसरात अस्वच्छ पाण्याची डबकी साचून डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यूचा फैलाव होत असल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभागानेही वेळीच औषध फवारणी व इतर उपाय-योजनांवर भर देणे गरजेचे आहे. परिसरात गेल्या काही दिवसात अनेक रुग्ण डेंग्यूवर सोनईसह अहमदनगर येथे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. आजाराबाबतच्या उपाययोजना म्हणून तत्काळ रुग्ण आढळले त्या परिसरात औषधफवारणी करणे गरजेचे आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे गरजेचे असले तरीही सोनईतील आरोग्य विभाग सुस्त आहे.डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात होत असल्याने यावर उपाययोजना म्हणून झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून, पुसून कोरडी करावीत, पाण्याच्या टाक्यांना झाकण लावा, डासांची पैदास होणारी ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट लावावेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या