Tuesday, March 25, 2025
Homeनगरसोनईच्या इसमाची प्रवरासंगम येथे गोदावरीत आत्महत्या

सोनईच्या इसमाची प्रवरासंगम येथे गोदावरीत आत्महत्या

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई येथील बेपत्ता झालेल्या इसमाने प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे दिसून आले आहे. श्रीकृष्ण उर्फ राजेंद्र लक्ष्मीकांत बिबवे (वय 63) हे शुक्रवार दि. 4 पासून बेपत्ता असल्याची खबर सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शनिवारी दुपारी प्रवरासंगम गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
कुणाल श्रीकृष्ण बिबवे यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली की शुक्रवार सायंकाळी घरी गेलो असता वडील घरी न दिसल्याने आईला चौकशी करून वडिलांचे मित्रांना विचारपूस केली.

- Advertisement -

याबाबत कोणालाच माहिती नसल्याने शोध घेतला असता वडिलांनी त्यांच्या मित्राला फोन करून प्रवरासंगमला आलो असून गाडी पुलावर लावली असून गाडी घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रवरासंगम येथे गेलो तेथे मोबाईल फोन व स्कूटी मिळाली, अशी खबर सोनई पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. प्रवरासंगम पुलावर गाडी लावल्याने सकाळपासून नदीत शोध घेतला जात होता. शनिवारी दुपारी गोदावरी नदीत मृतदेह सापडला असून नेवासा येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बिबवे यांच्या पश्चात वडील, चार भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...