सोनई|वार्ताहर|Sonai
गेल्या 7 जुलै रोजी सोनई येथील करोना संशयिताच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक व संपर्कात आलेल्यांपैकी 10 जण करोना संक्रमित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील अनेकांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. स्त्राव तपासणीसाठी घेतलेल्यांची संख्या 102 झाली असून त्या सर्वांना क्वारंटाईन केले आहे.
करोना पॉझिटिव्ह अहवालातील सर्व 10 व्यक्ती, मृतांचे नातेवाईक, कुटुंबीय असून त्यांचे रक्त तपासणीसाठी घेणारा सोनईतील लॅब चालक, ग्रामपंचायत समोरचे हॉस्पिटलचे डॉक्टर व शेजारच्या मेडिकल चालक या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत दरम्यान मृताचे नातेवाईक गल्लीतील शेजारी व संपर्कात आलेल्या 102 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले असून त्यांचे स्राव तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आशा सेवकांकडून घटना घडल्यानंतर गल्ली गल्लीतील घरासमोर जाऊन कुटुंबातील माहिती विचारली जात असून मशीनद्वारे ताप चाचणी केली जात आहे.
थर्मल स्कॅनिंगद्वारे शरीराचे तापमान घेताना अशिक्षित लोकात काहीशी घबराट होत आहे. सोनईत सर्वात मोठे दोन कापड दुकान, किराणा होलसेल व्यवसायिकांच्या दुकानात काम करणार्या नोकरवर्ग पुरुष, महिलांचीही तपासणी व माहिती घेतली गेली आहे. या दुकानांमध्ये मृत व्यक्तीचे लग्नाचा बस्ता व कापड किराणा खरेदी झाल्याचे समजले आहे.
तसेच पाथर्डी तालुक्यातील वधूचे कुटुंबाचीही प्रशासनाने माहिती घेतली असल्याचे समजले आहे गेल्या दोन दिवसापासून सोनईचे रस्ते गल्ल्यात पूर्ण शुकशुकाट दिसत असून बाहेरगावावरून येणार्यांची संख्या घटलेली आहे तर भीतीपोटी लोकांचा वावर कमी पडला आहे. वाहनांची वर्दळ व संख्या कमी झालेली आहे.
वस्त्या व गल्ली प्रवेशाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतःहून काट्याचे फास टाकून नवीन माणसे येण्यास मज्जाव केला असल्याचे दिसत आहे; तर पोलीस यंत्रणा सुद्धा पुन्हा सक्रिय झाली असून पोलीस गाडीचे सायरन गल्लीगल्लीत वाजू लागल्याने लोक घरात थांबणेच पसंत करत आहेत. तसेच पोलीस यंत्रणेकडून गावात फिरणारे ट्रिपल सीट व बिगर मास्कचे हिंडणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

सोनई या मोठ्या गावात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, आशा सेविका यांच्याकडून आता सुरू झालेल्या पाहणीबाबत सोनई येथील वैद्यकीय जाणकारांनी सांगितले की प्रशासनाला हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. गेल्या तीन महिन्यांत करोना बाबत घरोघरचे सर्वेक्षण झाले असते तर एवढी अवघड परिस्थिती निर्माण झाली नसती. गेली तीन महिने सोनई गाव परिसर क्लीन राहिला. सुदैवाने कोणाला करोना झाला नाही; परंतु प्रशासनाकडून गावात नवीन आलेल्या व्यक्तींच्या माहिती मिळवण्याच्या यंत्रणेमुळे तसेच आरोग्य विभागाने पाहणी केली नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा खाजगीत आरोप केला जात आहे.
सोनईतील 10 पैकी एक पॉझिटिव्ह व्यक्ती स्राव दिल्यानंतरही दोन दिवस बर्याच ठिकाणी फिरला, संपर्कात आला. एका युवा नेत्याच्या सोनईतील शोरूममध्येही गेलेला होता. शोरूममध्ये केवळ 5 मिनिटे फक्त बोलणे झाले. प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी धोका नको म्हणून हे युवा नेते स्वतःहून अहमदनगर येथे तपासणीसाठी गेले असून सोनई येथील काही युवक कार्यकर्तेही संपर्क आला नसला तरी रिक्स नको म्हणून स्वतःच्या स्रावांची खाजगी तपासणी करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.