Monday, May 5, 2025
Homeनगरछातीत लोखंडी सळई घुसल्याने कामगाराचा मृत्यू

छातीत लोखंडी सळई घुसल्याने कामगाराचा मृत्यू

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथील तिवाना ऑईल कंपनीमध्ये 11 जुलै रोजी काम करत असताना छातीमध्ये लोखंडी सळई घुसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विकासकुमार अशोककुमार यादव (वय 25) रा जमुआटोला पोस्ट हसीनाबाद जि. पलामू (झारखंड) हे मयत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

अहमदनगर सिव्हिल हॅास्पिटल येथे उपचारासाठी त्याला दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची खबर मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेच्या खबरीवरुन सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार श्री. राख पुढील तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक, जबाबदारी घेतो; राहुल...

0
दिल्ली । Delhi रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. ब्राऊन विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात एका शीख तरुणाने ऑपरेशन...