Wednesday, May 29, 2024
Homeदेश विदेशसोनाली फोगाट यांच्या मृत्यूचे गूढ उकलणार?; क्लब मालक आणि ड्रग पेडलर पोलिसांच्या...

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचे गूढ उकलणार?; क्लब मालक आणि ड्रग पेडलर पोलिसांच्या ताब्यात

पणजी | Panaji

सोशल मीडियास्टार आणि भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat Case) यांच्या मृत्यूसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यातील (Goa Police) अंजुना समुद्र किनारी असलेल्या कर्लिस रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या मालकाच्या कर्लिस रेस्टॉरंटमधील बाथरुममध्ये ड्रग्स आढळून आलं आहे.

विशेष म्हणजे सोनाली फोगाट याच बाथरुममध्ये गेली होती. तिथेच मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय एका ड्रग्ज (Drugs) पेडलरलाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने हत्येची तक्रार दाखल केली होती. भावाने दिलेल्या जबाबानुसार सोनाली फोगाट जिथे जिथे गेल्या होत्या तिथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच, अनेकठिकाणी चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने काहीतरी खायला दिलं असल्याचं स्पष्ट झालंय.

सोनाली फोगाट यांनी ड्रग्स प्यायलानंतरच त्यांची तब्येत बिघडली. सकाळी ४.३० वाजता सोनाली फोगाट शुद्धीत नव्हत्या तेव्हा आरोपीने त्यांना शौचालयात नेलं. त्यावेळी दोन तासात काय घडलं? याचं आरोपींनी उत्तर दिलं नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या