भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे हृदय विकाराने निधन (Sonali Phogat Passed Away) झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत.
पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या टिकटॉक स्टार म्हणूनदेखील प्रसिद्ध होत्या.
सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला.
सोनाली फोगट या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा होत्या. सोनाली फोगाट यांना भाजपने उमेदवारी दिली होती.
हरियाणातल्या आदमपूर जिल्ह्यातल्या हिसार मतदारसंघातून भाजपने फोगाट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.
त्यांच्यासमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचं आव्हान होतं. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झालेला होता.