Wednesday, May 22, 2024
Homeधुळेसोनगीर पोलिसांनी गो-तस्करी रोखली

सोनगीर पोलिसांनी गो-तस्करी रोखली

सोनगीर । Songir । वार्ताहर

वाहनातून कत्तलीसाठी नेणार्‍या गोवंश जनावरांची सोनगीर पोलिसांनी पाठलाग करून सुटका केली. नऊ गुरे व वाहन असा एकुण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सोनगीर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पहाटे तीन वाजता पोलिसांना सरवड फाटा ते लामकानी दरम्यान नंदाणे गावाजवळ एक सोनेरी रंगाची महिंद्रा झायलो कंपनीचे वाहन (क्र. एम.एच. 15 ई-7312) संशयास्पद वाटले. त्यामुळे पोहेका दराडे व चालक पोकॉ सोनवणे, कमलेश महाले यांनी नंदाणे गावाजवळ वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन आणखी वेगात चालवून पळू लागला. त्यामुळे सोनगीर पोलिसांनी देखील पाठलाग सुरू केला. त्यानंतर झायलो वाहनावरील चालकाने थोड्या अंतरावर वाहन थांबवून अंधारात पळून गेला.

वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे लहान-मोठे असे नऊ जनावरे दाटीवाटीने कोंबून क्रुरतेने, आखुड दोरीने बांधलेले दिसले. कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात होती. 27 हजारांची नऊ लहान, मोठे गावराण गोवंशीय जनावरे व पाच लाखांचे वाहन असा एकुण पाच लाख 27 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दराडे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेकॉ दराडे, पोकॉ सोनवणे, कमलेश महाले यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या