Sunday, September 29, 2024
Homeधुळेसोनगीर पोलिसांनी विदेशी दारुची तस्करी रोखली

सोनगीर पोलिसांनी विदेशी दारुची तस्करी रोखली

सोनगीर । वार्ताहर dhule

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) वाघाडी फाट्यालगत बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर सोनगीर पोलिसांनी पकडला. त्यात दहा लाख 38 हजार रुपये किंमतीचे अवैध दारू व बिअरचे खोके तसेच दहा लाखाचे हजाराचे कंटेनर असा 20 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

- Advertisement -

येथील पोलीस गस्ती पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरकडून येणारे कंटेनरला (क्र.एचआर 55 वाय 8449) थांबण्याचा इशारा केला असता चालकाने महामार्ग सोडून वाघाडी जाणार्‍या उपमार्गाकडे कंटेनर वळवला व वेग वाढवत गस्ती पथकाला चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पण थोड्याच अंतरावर कंटेनर थांबवून चालक व सहचालक पळून गेले. दोघांचा बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. कंटेनरचे मागील दरवाजे बंद असल्याने ते पोलीस ठाण्यात आणले व तपासणी केली असता दारु व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळुन आले.

ही दारु व बिअरला पंजाबात विक्री करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले. मात्र ती महाराष्ट्रात अवैधरीत्या विक्रीसाठी नेली जात होती. पंजाब राज्य मर्यादित असे लेबल असलेले 500 मिलिलीटरचे टुबर्क कंपनीचे 58 बिअरचे बॉक्स तसेच मॅकडॉल व्हिस्की, रॉयल स्टॅगचे बॉक्स असे दहा लाख 38 हजार 600 किमतीची दारु तसेच 10 लाखांचा कन्टेनर वाहन असा एकूण 20 लाख 38 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत काळे, धुळे ग्रामीण साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, उप निरीक्षक रवींद्र महाले, अमरीश सानप, राजेश ठाकूर, सुरज साळवे, विजयसिंह पाटील यांनी केली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांनी येथे भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व सहकारी पोलिसांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या