Saturday, March 29, 2025
Homeराजकीयइंधन दरवाढ करुन सरकारने नफेखोरी करू नये - सोनिया गांधी

इंधन दरवाढ करुन सरकारने नफेखोरी करू नये – सोनिया गांधी

नवी दिल्ली – सध्या संकटाचा काळ आहे. अशा परिस्थितीत सरकारने नफेखोरी करू नये, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी 16 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले होते. सोमवारी आंदोलन सोनिया गांधींनी एक व्हिडिओ प्रसारित केला.

व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, संकटाच्या काळाचा गैरफायदा घेऊन नफेखोरी करणे ही सरकारची जबाबदारी नसून देशातील जनतेला आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये मोदी सरकारने 22 वेळा सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. सन 2014 नंतर मोदी सरकारने कच्च्या तेलाच्या कमी होणार्‍या किमतींचा जनतेला फायदा देण्याचे सोडून पेट्रोल आणि डिझेलवर 12 वेळा उत्पादन शुल्क वाढवून 18 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली केली आहे. हे म्हणजे जनतेच्या कमाईतून पैसे काढून सरकारी खजिना भरण्याचे जिते जागते उदाहरण आहे.

- Advertisement -

एकीकडे देश करोनासारख्या महासाथीच्या संकटाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा मार जनतेला बसत आहे. दिल्लीसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती 80 रुपये प्रति लिटरहून जास्त झाल्या आहेत. याचा थेट मार शेतकरी, नोकरदारवर्ग, देशातील मध्यमवर्ग आणि छोटे-छोटे उद्योजकांना बसत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. आणि मार्चपासून उत्पादन शुल्कात करण्यात आलेली वाढ देखील मागे घ्यावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाकडून येत्या आठवड्यासाठी अवकाळी पावसाचा अंदाज;...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) राज्यातील विविध जिल्ह्यांतील तापमानाचा उच्चांक वाढतांना दिसत आहे. पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवत असून दिवसा उन्हाचा...