Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याSonia Gandhi : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सोनिया गांधींचं PM मोदींना...

Sonia Gandhi : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सोनिया गांधींचं PM मोदींना खरमरीत पत्र; म्हणाल्या,…

दिल्ली | Delhi

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा कुठलाही अजेंडा सरकारने जाहीर केला नाही. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सोनिया गांधींनी ९ मुद्दे उपस्थित केलेत.

- Advertisement -

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात आर्थिक परिस्थिती, महागाई, बेरोजगारी या विषयांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे आणि एमएसपीच्या हमीभावाचे आजपर्यंत काय झाले? यावरही भाष्य करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सोनिया गांधी यांनी अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी करत जात जनगणना तातडीने करण्याचे आवाहन केले आहे. वरील मुद्द्यांसह सोनिया गांधींनी पत्रात केंद्राने फेडरल संरचना, राज्य सरकारे आणि हिमाचल प्रदेशातील आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. याशिवाय देशातील जातीय तणाव, मणिपूर हिंसाचार आणि लडाखमध्ये चीनची घुसखोरी हे मुद्द्यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे अधिवेशन चालणार आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे. राज्यसभेनेही खासदारांना सूचित केलं आहे की १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे तेव्हा सर्व खासदारांनी त्यासाठी उपस्थित रहावं. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत हे कामकाज चालेल त्यानंतर दुपारी २ ते ६ या वेळात पुढचं कामकाज चालेल असंही नमूद करण्यात आलं आहे. या अधिवेशनाचा अजेंडा काय? हे अद्याप समोर आलेलं नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या