मुंबई | Mumbai
प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला पुढे गेलेल्या अंगरक्षकांमधील दोन जण खाली पडल्याची माहिती आहे. या प्रकारात सोनू निगमला कोणतीही इजा झाली नसून त्यांच्या अंगरक्षक जखमी झाला आहे.
आमदाराच्या पोराकडून धक्काबुक्की झाल्याचा दावा समोर केला जात आहे. आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आलीय.
सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हेही तिथे होते. या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकी झाल्यानंतर स्वप्नील यांनीदेखील एका अंगरक्षकाला धक्का दिला त्यावरन हा वाद झाल्याचं समोर येतंय.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगमला फार इजा झाली नसून त्याच्या एका अंगरक्षकाला आणि मित्राला धक्काबुकीत इजा झाल्याचं म्हटलं जात.
या घटनेनंतर, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी IPC कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत का धक्काबुक्की केली? या धक्काबुक्कीचा मागचा उद्देश काय आहे? या संबधी अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.
यानंतर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्याने या ठिकाणी नेमकं काय घडलं याबाबत स्वतः माहिती दिली. तसेच आरोपीचं नाव घेत त्याने कोणाकोणाला धक्का दिला हेही नमूद केलं. सोनू निगम म्हणाला, काहीही झालेलं नाही. कॉन्सर्ट झाल्यावर मी स्टेजवरून खाली उतरत होतो. आजकाल सेल्फी आणि फोटोग्राफचे जे प्रकार सुरू आहेत त्यात कोणीही समजून घेत नाही. स्वप्निल नावाच्या व्यक्तीने मला पकडलं. त्याचं नाव मला नंतर माहिती झालं. त्याने मला पकडलं, तर पहिल्यांदा मला वाचवायला हरिप्रकाश आले. त्याने हरीला धक्का दिला.
त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मीही पडलो. व्हिडीओत मीही स्टेजवर खाली पडताना दिसत आहे. बाजूला असतो, तर मी स्टेजच्या खाली पडलो असतो. त्यावेळी मला वाचवण्यासाठी रब्बानी आले. रब्बानींना तर त्याने जोरात धक्का दिला आणि ते मागे आदळले. वाचले, नाहीतर जीवच गेला असता. त्यांच्या मागे लोखंड असतं, तर त्यांचा मृत्यू झाला असता. असं सोनू निगम म्हणाला.