Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनजेट एअरवेजपासून ते भोंग्यांपर्यंत...; सोनू निगम 'या' वादांमुळे नेहमीच राहिला चर्चेत

जेट एअरवेजपासून ते भोंग्यांपर्यंत…; सोनू निगम ‘या’ वादांमुळे नेहमीच राहिला चर्चेत

गायक सोनू निगम नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहत असतो. आता चेंबुरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान झालेली धक्काबुक्की चर्चेत आली आहे. सोनूने उद्धव ठाकरे गटाचे आमदार फातर्पेकर यांच्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सध्या याप्रकरणाची सोशल मिडीयावर चोरदार चर्चा सुरु आहे. तसेच सोशल मीडियावर सोनू निगमविषयीचे काही वाद व्हायरल होत आहेत. या वादांमुळे सोनू निगम अनेकदा चर्चेत राहिला आहे.

- Advertisement -

सोनू निगम हा टी सीरिजच्या वादात अडकला होता. यावेळी त्याने काही धक्कादायक खुलासे केले होते. दिव्या खोसला कुमार यांच्यासोबत एका वेगळ्या वादात सोनू निगम अडकला होता. भुषण कुमार हे गायकांना त्रास देत असल्याची तक्रार सोनूने केली होती. टीसीरिजचे प्रमुख म्हणून ते मनमानी करत असल्याचे सोनूने म्हटले होते.

सोनूचा जेट एयरवेजमधील वाद गाजला होता. त्याने फ्लाईटमध्ये अनाउसमेंट प्रणालीचा वापर करत गाणे गायले. त्यामुळे तो वादात अडकला. त्याच्या या कृतीमुळे एका क्रु मेंबर्सला आपली नोकरी गमवावी लागली होती. यांनतर सोनू निगमवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

राधे मा चे समर्थन केल्याप्रकरणी सोनू चर्चेत आला होता. त्याने तिची तुलना काली मा शी केली होती.

मशिदीवरील भोंग्याने माझी झोप खराब होते. एवढी धार्मिक कट्टरता काय कामाची. असे करणे म्हणजे गुंडगिरी आहे. असे ट्विट त्याने केले होते. सोनुच्या अशा भूमिकेने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अनेकांनी त्याला ट्रोल केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...