मुंबई | Mumbai
सोनू सूद सध्या आपल्या फिल्मी करिअरपेक्षा सामाजिक कार्यामुळे चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदतीचा हात पुढे केला विशेष म्हणजे त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्याने सुरक्षित घरी पोहोचवले. सोनूचे सामाजिक कार्य अजूनही सुरु आहे. त्याच्या याच समाजिक भान जपत मदतीसाठी पुढे येण्याच्या गुणाचा गौरव करत संयुक्त राष्ट्राने (United Nations) त्याचा सन्मान केला आहे.
त्याला यूनाइटेड नेशन्स द्वारा त्याला एसडीजी स्पेशल ह्यूमैनीटेरीयन एक्शन (SDG Special Humanitarian Action)प्रदान करण्यात आला आहे. करोना संकटात सोनूने केलेल्या सढळ मदतीच्या अनेक कहाण्या समोर आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सुद हा अनेक खलनायकी रूपात रसिकांसमोर आला असला तरीही वास्तवात मात्र त्याचं ‘हिरो’चं रूप पहायला मिळालं आहे. त्याचे आभार मानण्यासाठी अनेकांनी कलात्मक गोष्टी शेअर केल्या आहेत. काहींनी त्यांच्या नव्या व्यवसायाचा श्रीगणेशा करत दुकानाचं नाव ‘सोनू’ ठेवलं तर काहींनी आपल्या नवजात बालकाचं नाव ‘सोनू’ ठेवल आहे.