Monday, April 28, 2025
Homeमनोरंजनसोनू सूद म्हणाला, “आर्यन खान प्रकरणात...”

सोनू सूद म्हणाला, “आर्यन खान प्रकरणात…”

शिर्डी | शहर प्रतिनिधी

साईबाबांचा (saibaba) आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे. अडचणी येतात मात्र सत्याच्या बाजूने नेहमी साईबाबा उभे राहतात. आर्यन खान प्रकरणात (aryan khan drug case) जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल असे वक्तव्य सिनेअभिनेता सोनू सूद (sonu sood) याने शिर्डीत केले आहे.

- Advertisement -

दरम्यान अभिनेता सोनू सूद याने आपल्या परिवारासह मंगळवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी विमानतळावर (shirdi airport) संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आरीफ शेख, स्वराज त्रिभुवन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

श्री साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सोनू सूदने सांगितले की, साईबाबांच्या दर्शनासाठी पहिल्यांदा नागपुरवरून (nagpur) आलो होतो. त्यानंतर आता लॉकडाऊन (lockdown) संपल्यानंतर साईमंदीर (sai temple) खुले झाले असल्यामुळे दुसऱ्यांदा परीवारासह याठिकाणी आलो असून साईंच्या दर्शनानंतर मन प्रसन्न झाले आहे. करोनाचे (covid19) संकट लवकरात लवकर दुर व्हावे आणी विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पुर्ववत सुरू व्हावे यासाठी साईसाबाबांना साकडे घातले असल्याचे त्याने सांगितले.

शिर्डी शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत येणाऱ्या काळात काही समस्या असेल तर त्या माझ्याकडून पुर्ण करण्यासाठी साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे त्याने सांगितले. माझ्यावर आलेले आरिष्ट संकटे माझ्या पाठीशी असलेल्या श्री साईबाबांच्या आशिर्वादासह देशातील असंख्य गोरगरीबांचे खंबीर साथ यामुळे दुर झाले असल्याचे सांगितले.

बॉलीवूडमधील (bollywood) लहान मोठे अभिनेते नशेच्या मार्गावर जात असून आर्यन खान प्रकरणाबाबत विचारले असता त्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, बॉलीवूड नेहमीच चांगले राहिले असून आजपर्यंत समाजासाठी खुप योगदान दिले आहे. अजून थोडा वेळ द्या, बाबांचा चमत्कार नक्कीच होईल, विश्वास ठेवा साईबाबा सत्याच्या बाजूने पाठीशी खंबीरपणे उभे राहातात, जे पण सत्य असेल ते लवकरच बाहेर पडेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.

टी २० वर्ल्ड कप (T20 world cup) स्पर्धेत भारतीय संघाचा (team india) दारून पराभव झाला, यावर उत्तर देताना म्हणाला की, हारकर जितने वालों को बाजीगर कहते है. दरम्यान सोनू सुदला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शिर्डी (shirdi) शहरातील जून्या पिंपळवाडी रोडलगत असलेल्या साईमंदीर प्रवेशद्वार क्रमांक दोनबाहेर सोनू सूदने आपल्या चाहत्यांना गाडीच्या दरवाजावर उभे राहून वंदन करताच चाहत्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक...