Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजन‘एक ती’ मराठी चित्रपटाचे लवकरच प्रदर्शन

‘एक ती’ मराठी चित्रपटाचे लवकरच प्रदर्शन

मोदलपाडा । वार्ताहर Modalpada

धुळे, नंदुरबार, मालेगाव आणि नाशिक या भागात चित्रीकरण झालेला रीया स्टुडिओ, पुणे निर्मित ‘एक ती’ हा मराठी चित्रपट येत्या 12 फेब्रुवारी 2021 ला संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

तसेच या चित्रपटाची तीन गाणी 9, 11 आणि 14 जानेवारीला प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाची गाणी आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, प्रीती तेजस या सुप्रसिध्द गायकांनी गायली आहेत. या चित्रपटामध्ये प्रेमा किरण, विजय कदम, अनिकेत केळकर या दिग्गज कलाकारांनी देखील या आपली भुमीका साकारली आहे.

चित्रपटाचे निर्माते सचिन अवसरमल यांनी रीया स्टुडिओ अंतर्गत निर्मिती केली असून त्यांनी या माध्यमातून बर्‍याच खान्देशी कलाकारांना संधी दिली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यातील बरेच कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात खान्देशी कलाकारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निर्माता सचिन अवसरमल यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर पारखे यांनी तर छायाचीञण कृष्णा राऊत यांचे आहे. या चित्रपटाला संगीत तेजस चव्हाण यांनी दिले आहे. मुख्य भुमीकेत शिरपूरचे सुप्रसिध्द कवी, लेखक ज्येष्ठ विचारवंत तुषार बैसाणे हे या चित्रपटात दिसणार आहेत.

रुपाली जाधव ही सुप्रसिध्द अभीनेत्री त्यांच्या सोबत मुख्य नायिका म्हणुन असणार आहे. यासह या चित्रपटात यश गावडे, आकांशा साकरकर, शेषपाल गणवीर, खांदेश रत्न पुरस्कार म्हणुन नावाजलेले अजय बिरारी, अभिनेता रफीक शेख यांची सुध्दा महत्वपुर्ण भुमीका या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे प्रोडक्शंन मॅनेजरचे काम देवेंद्र पिले यांनी पाहिले आहे. पोस्ट प्रोडक्शंस आय फोकस स्टुडिओ मुंबई येथे झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या