नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला. पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर गतविजेत्या आणि दिग्गज ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने तब्बल २७ वर्षानंतर आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावत “चोकर्स” टॅग पुसून काढत आणि आयसीसी ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने तीन दशकांपासूनचा ICC स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला. यासह १९९८ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय न मिळवू शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली.
???????????????????????????????????? ????????????
South Africa take home the ???????????????? ????#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/Yy4C4AQEO7
— ICC (@ICC) June 14, 2025
इंग्लंडच्या लॉर्ड्सवर झालेल्या ICC World Test Championship 2025 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात रबाडाच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डाव फक्त २१२ धावात संपुष्ठात आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखल्यानंतर आफ्रिकेला त्यांच्या पहिल्या डावात त्याचा फायदा घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेचा डाव फक्त १३८ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात महत्त्वाची ७४ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना फार प्रभावी कामगिरी करता आली नाही. मात्र एलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांनी केलेल्या ४३ आणि नाबाद ५८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २०७ धावांपर्यंत मजल मारली. आणि आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले.
कागिसो रबाडाच्या निर्णायक विकेट्स
दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला तीन विकेट घेतले. फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमाने ८४ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कला दोन यश मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले.
Aiden Markram rose to the occasion at Lord’s with a century for the ages ????
South Africa’s hero in the Ultimate Test and the @aramco POTM ????️#WTC25 pic.twitter.com/3g7v9ez3dM
— ICC (@ICC) June 14, 2025
एडन मार्करमचे ऐतिहासिक शतक
२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ७० धावांवर दुसरी विकेट गमावली. एडेन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमाने तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे काम सोपे झाले. या भागीदारीदरम्यान मार्करमने १०१ चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मार्करम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.दुसरीकडे, हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असतानाही टेम्बा बावुमाने शानदार खेळी करत १३४ चेंडूत ६६ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. बावुमाच्या जागी आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने ६ धावा करून बाद झाला. मात्र तोपर्यंत विजय आफ्रिकेच्या आवाक्यात आला होता. त्यानंतर डेव्हिड वेडिंगहॅम आणि एडन मारक्रम यांनी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावा केल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





