Saturday, July 27, 2024
Homeनगरसोयाबीन पिकांवर मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव

सोयाबीन पिकांवर मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगावमध्ये (Pachegav) यंदा खरीप हंगामात (Kharif Season) विक्रमी सोयाबीन पिकांची पेरणी (Soybean Crops Sowing) झाली. अनेक जातीचे बियाणे शेतकर्‍यांनी घेऊन त्याची पेरणी (Sowing) केली, त्याची उगवणही चांगली झाली असून पेरणीनंतर अवघ्या एक महिन्यामध्येच सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ (Yellow Mosaic Virus) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. पाचेगाव भागात काही ठिकाणी (प्लॉटवर) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

यावेळी काही ठिकाणी सोयाबीनवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव पसरत असल्याचे निदर्शनास आले. या अगोदर या परिसरात सोयाबीन पिकांवर (Soybean) गोगलगायींचा (Snails) प्रादुर्भाव दिसून आला होता, तो काही प्रमाणात आटोक्यात येत नाही. तोच मोझाईक रोगांचा (Yellow Mosaic Virus) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी आपले सोयाबीन पीक चांगले आणून देखील या रोगांमुळे शेतकर्‍यांना पुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

Ahmednagar ZP Recruitment : झेडपीत आजपासून मेगाभरती

सोयाबीन पिकामध्ये (Soybean Crops) असे एखादे विषाणूजन्य झाड आढळून आल्यास त्वरित उपटून नष्ट करावे. त्याचप्रमाणे रोगाची लागण जास्त प्रमाणात असेल तर त्या शेतातील बियाणे पुढील वर्षी पेरणीसाठी वापरू नये, सोयाबीनमध्ये मावा आणि पांढरी माशी (White Fly) या रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतामधील आणि बांधावरील तणे आणि पूरक वनस्पतींचा नाश करावा, तसेच पिकावर थायामिथायाम 25 टक्के डब्ल्यूपी या आंतरप्रवाही कीटकनाशकाची एकरी 80 मिली या प्रमाणामध्ये फवारणी करावी. त्यासोबतच पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रीयंटचा वापर 200 प्रति एकरी बायामियाँक्झाम या कीटकनाशकासोबत करावा. यामुळे पिकाची प्रतिकार शक्ती खाण्यास मदत होईल असे मार्गदर्शन शेतकर्‍यांना कृषी विभागाच्यावतीने (Agriculture Department) सांगितले जात आहे.

खंडकर्‍यांपाठोपाठ आकारी पडितांचाही प्रश्न सुटणार

मी चार एकर सोयाबीन केली असून ती एक महिन्याची झाली आहे. आता सोयाबीन पिवळी पडू लागली असून त्यावर आम्ही काही तज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे. या पिकावर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अजून तरी चांगले औषध नाही. औषधे फवारणी करून देखील त्या पिकांवर लगेच कोणताही बदल होत नाही. त्यामुळे पीक चांगले येऊन देखील उत्पादनात घट होणार असल्याने माझ्यासह अन्य शेतकर्‍यांनी धास्ती घेतली आहे.

रामकृष्ण तुवर शेतकरी पाचेगाव

रोग कसा ओळखावा ?

कमी वयाच्या सोयाबीन प्लॉटवर या रोगाची लागण लवकर होते. या रोगामुळे सुरुवातीला पिकाच्या पानांवर पिवळसर नक्षीदार ठिपके दिसू लागतात. रोगट झाडाच्या पानाचा काही भाग हिरवा तर काही भाग पिवळा दिसून येतो. यालाच मोझॅक असे म्हणतात. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसून येतात आणि कडील पाने पिवळी पडून आकाराने लहान दिसू लागतात. पिकाची वाढ खुंटते आणि अशा रोगग्रस्त रोपांना कमी प्रमाणात फुले लागतात. त्याचप्रमाणे रोगामध्ये दाणे भरत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते.

या रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बिया आणि रस शोषणाचा किडीच्या माध्यमातून होतो. मागील वर्षी जर सोयाबीन पिकामध्ये काही झाडावर विषाणूची लागण झालेली असेल आणि ते रोगट झाड जर उपटून नष्ट केले नसेल तर त्या आडाचे रोगट बियाणे पुढील वर्षी हा रोग पसरविण्यास कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे माशा आणि पांढरी माशी या रस शोषणाचा किडीमार्फत ही मोझाईक हा विषाणुजन्य रोग सोयाबीनमध्ये संक्रमित होतो.

विकास बाचकर कृषी सहाय्यक, पाचेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या