अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
सर्वसामान्यापर्यंत पोलीस सेवा कशी पोहचेल, लोकांची पोलिसांकडे असलेली कामे तत्काळ मार्ग लावण्याबरोबरच
जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगतिले.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी काम केल्यानंतर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील यांची मागील आठवड्यात बदली झाली आहे. त्यांनी गुरूवारी नगरच्या अधीक्षकपदाची सूत्रे हातात घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मावळते अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अधीक्षक पाटील म्हणाले, गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींचा लवकारात लवकर शोध घेणे, चोरीला गेलेला माल हस्तगत करून तो फिर्यादीला परत करणे या गोष्टीला प्राधन्या देण्यात येईल. मला भेटण्यासाठी येणार्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.
याबरोबरच पोलिस कर्मचार्यांना सुटट्या, बदल्या, पदोन्नती यासह त्यांना कुटुंबियांसोबत वेळ द्यायचा असेल तर त्यांना सुटी दिली जाईल असे स्पष्ट करतानाच आनंदी पोलिसच जनतेची चांगली सेवा करू शकतात असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.