Saturday, June 20, 2026
Homeक्राईमCrime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका || चालकासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू असलेला कथित देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, ग्राहक यांच्यासह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आदी 60 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना माहिती मिळाली होती की, अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील साई मिडास इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर सुरू असलेल्या अँक्यूम मसाज पार्लर व स्पा सेंटरमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून पुरूष ग्राहकांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह सापळा रचला. बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर खात्री झाल्यावर रात्री 11.35 वाजता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये मॅनेजर अनिकेत अशोक बचाटे (वय 27, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) व कामगार काळुराम भिमा समिंदर (वय 28, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे), ग्राहक सजन एस. (वय 45, रा. केरळ) हे आढळून आले. तपासादरम्यान स्पा सेंटरचा मालक संतोष गणेश बघे (रा. छत्रपती संभाजीनगर) असल्याची माहिती समोर आली. स्पा सेंटरमधील विविध रूमची तपासणी केली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत महिला आढळून आली.

चौकशीत संबंधित महिलांनी स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. चार महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, कामगार व ग्राहक अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक वैद्य, निरीक्षक जगदीश भांबळ, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार नितीन उगलमुगले, सुधीर खाडे, छाया रांधवन, अर्चना काळे आदींच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...