Monday, November 25, 2024
Homeधुळेphotos : स्पार्किंग मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट, पाच महिलांचा होरपळून मृत्यू

photos : स्पार्किंग मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट, पाच महिलांचा होरपळून मृत्यू

निजामपूर । Nizampur । वार्ताहर

साक्री तालुक्यातील वासखेडी गावानजीक (Vaskhedi village) स्पार्किंग मेणबत्ती कारखान्यात (sparking candle factory) आज दुपारी भिषण स्फोट (terrible explosion) होवून आग (fire.) लागली. त्यात पाच महिला कर्मचार्‍यांचा (five women employees) होरपळून जागीच मृत्यू (Died on the spot) झाला. तर एक कर्मचारी गंभीररित्या भाजल्याने त्यांना नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत जळालेल्या पाच महिला व गंभीर एक महिला जैताणे गावातील आहेत. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. तर मृत महिलांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

- Advertisement -

12 हजारांची लाच घेताना कोतवालासह पंटर जाळ्यात

आशाबाइ भय्ैया भागवत (वय 34), पुनम (राजश्री) भैय्या भागवत (वय 16), नैनाबाई संजय माळी (वय 48) व सिंधूबाई धुडकू राजपुत (वय 62) सर्व रा.जैताणे/निजामपुर ता.साक्री अशी मयत महिला कर्मचार्‍यांची नावे आहेत. तर निकता सुरेश महाजन (वय 18) व संगीता प्रमोद चव्हाण (वय 35 रा. जैताणे ता.साक्री) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

वासखेडी या गावानजीक पत्र्याच्या शेडमध्ये भवानी सेलिब्रेशन नावाचा कारखाना सुरू होता. त्यात वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणारी स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्यात येत होती. या कारखान्यात जैताणेसह परिसरातील महिला मजुरी कामासाठी जात होत्या. ही कंपनी रोहिणी जगन्नाथ कुवर व सुयेश शापु माने (रा.धोत्री, ता. तुळजापुर, जि.उस्मानाबाद) यांच्या मालकीचे असून कारखान्यावर सुपरवायझर म्हणून रोहिणी कुवर यांचे वडील जगन्नाथ रघुनाथ कुवर, (रा.वासखेडी) हे कामकाज पाहत होते.

पारोळ्यात घरफोडी : एक लाखाचा ऐवज लंपास

दरम्यान आज दि.18 रोजी कारखान्यात नेहमीप्रमाणे मेणबत्ती बनविण्याचे काम सुरू होता. दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास या कारखान्यात स्फोट होवून भिषण आग लागली. त्यात पाच मजुर महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक महिला गंभीररित्या भाजल्या गेल्या.

घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आशा गांगुर्डे, साक्री ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आदींसह अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच वासखेडी, जैताणे परिसरातील ग्रामस्थांसह कारखान्यात काम करणार्‍या महिलांच्या परिवारातील सदस्य घटनास्थळी धावून आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशामक वाहनेही दाखल झाली. त्यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविली. त्यानंतर जखमींना प्रथम जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून नंदुरबार शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

अन् प्राजक्ता माळी मिसेस सलमान होता होता राहीली…

दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मृताचा नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवत नागरिकांची समजुत काढण्यास प्रयत्न केला. कारखान्याची सर्व बाजुने पाहणी केली. एका शेडमध्ये पार्किग मेणबत्ती तयार करण्यासाठी लागणारे स्फोटक साहित्य आढळून आले. तर जवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये कमी जागेवर या महिला मजुरांचा मदतीने स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचे काम सुरु होते, असे दिसून आले.

मालकासह भागिदाराला अटक करा

घटनेनंतर वासखेडी, जैताणे परिसरातील ग्रामस्थांसह मृत व जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसंगी संतप्त नागरिकांनी वासखेडीपासुन एककि.मी अंतरावर शेतात सुरू असलेल्या कारखान्याला परवानगी आहे का?, या ठिकाणी विजेचे कनेक्शन नियमानुसार आहे का? असे प्रश्न उपस्थित करीत कारखाना मालक, भागिदारासह संबंधीतांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी लावून धरली. तोपर्यंत चौघा महिलांचे मृतदेह उचलु देणार नाही, अशी भुमिका घेतली.

तसेच यापुर्वी ही असा प्रकार घडला असल्याचे सांगत. या कारखान्या परिसरात कोणालाही येवु देत नसल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांनी त्यांची समजुत काढली. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.

तुळजापुरातील कारखाना मालकासह चौघांवर गुन्हा

या घटनेप्रकरणी भवानी सेलीब्रेशन या कंपनीचे मालक रोहिणी जगन्नाथ कुवर, सुयेश शापु माने (रा.धोत्री ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद) व सुपरवायझर जगन्नाथ रघुनाथ कुवर, ऑपरेटर अरविंद जाधव (रा. वासखेडी ता.साक्री) यांच्याविरूध्द निजामपूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भैय्या सुरेश भागवत (वय 36 रा.जैताणे ता.साक्री) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, वासखेडी येथे भवानी सेलीब्रेशन या कारखान्यात रोहिणी कुवर आणि सुयश माने यांनी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपयाययोजना न करता स्फोटक दारु वापरुन वाढदिवसाचे सेलीब्रेशनसाठी लागणारी स्पार्कींग मेणबत्ती तयार करण्याचे वर्कशॉप, शासकीय परवानगी न घेता, बालमजुर मजुरीस लावले.

वर्कशॉपवर सुपरवायझर म्हणून जगन्नाथ कुवर याने कामकाज पाहिले. वर्कशॉपला आग लागुन चार युवतीसह महिलांच्या मृत्यूस व दोन महिलांच्या गंभीर दुखापतीस कारणीभुत झाले. म्हणुन चौघांवर निजामपुर पोलीस ठाण्यात भांदवी कलम 304, 337, 338 सह विस्फोट अधिनियम कलम 3 सह बालकामगार प्रतिबंध अधिनियम 1986 कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एच.एच.गायकवाड हे करीत आहेत.

विनापरवगानी सुरू होता कारखाना

वाढदिवसाचे सेलिब्रेशनसाठी लागणारी स्फोटक मेणबत्तीसाठी लागणारी स्फोटक दारु वापरुन व कोणत्याही प्रकारचे शासकीय परवानगी न घेता वासखेडी येथे भवानी सेलीब्रेशन हा कारखाना (वर्कशॉप) सुरु होता. तसेच मजुरांची सुरक्षितेसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी नव्हत्या. या ठिकाणी बालमजुर देखील लावण्यात आले होते. येथे काम करणारा ऑपरेटर अरविंद जाधव (रा.वासखेडी) हा देखील घटनेनंतर पळून गेला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या