Sunday, May 19, 2024
Homeनगरविशेष सहायक सरकारी वकीलांची नियुक्ती

विशेष सहायक सरकारी वकीलांची नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष सहायक सरकारी वकील यांची निवड प्रक्रिया पार पडून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच 23 जणांची निवड यादी जाहीर केली आहे. या नियुक्तीसाठी जिल्हाभरातून एकूण 80 जणांनी अर्ज केले होते. त्यांची तोंडी परीक्षा पार पडून यातून 23 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायालयात हे सरकारी वकील काम करणार आहेत.

- Advertisement -

विशेष सहायक सरकारी वकील म्हणून अभिषेक प्रमोद नागरे, सागर हरिश्चंद्र चव्हाण, राहुल विठ्ठल शेळके, पायल भास्कर एखंडे-वर्पे, स्मिता संजय लवांडे, मयुर कारभारी वाखुरे, श्रीम. शोभा यादवराव वाकचौरे, प्रदीपकुमार धोंडीबा रणधीर, आवेस अब्दुल रहेमान, श्रीम. रेणू राजेश कोठारी, श्रीम. सुचिता आनंद बाबर-वायकर, धैर्यशील लक्ष्मणराव वाडेकर, श्रीम. आशा वसंत बाबर, बागवान तौसिफ मुस्ताक, सचिन अशोक पटेकर, श्रीम. प्रतीक्षा सुहास रोहमारे-तोडरमल, श्रीम. सविता सोन्याबापु गांधले-ठाणगे, श्रीम. शिल्पा भीमराव चिंतेवार, गौरव अशोक भोसले, श्रीम. अर्चना मंगलेश सेलोत, श्रीम. भाग्यश्री शंकरराव कुंजर, संतोष रामकृष्ण दांगडे, शेख शबाना बनेसाब या 23 जणांची निवड झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या