Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगBlog : प्रयोगशील शिक्षणव्रती!

Blog : प्रयोगशील शिक्षणव्रती!

डॉ. के. आर. शिंपी यांच्या (23 मे) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा त्यांच्या सुहृदाने घेतलेला आढावा….

शिक्षणक्षेत्रातील एक आनंदयात्री, प्राध्यापक, विभागप्रमुख, उपप्राचार्य, प्राचार्य, संचालक, चिकित्सक लेखक, संशोधक, संशोधन-’मार्गदर्शक, संयोजक, समन्वयक, संवेदनशील व शिस्तप्रिय प्रशिक्षक असे व्यक्तिमत्त्व अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

- Advertisement -

या प्रदीर्घ कालावधीत त्यांची कामगिरी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात सुसंवादी वातावरणातून परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी निर्माण झालेला एक उत्कृष्ट वस्तूपाठ आहे, अशा शब्दांत सर डॉ. मो. .स. गोसावी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

सर, गेली 51 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध विविध पदावर कार्य केले आहे. बीवायके महाविद्यालयात 37 वर्षे, जेडीसी बिटको इन्स्टिट्यूटचे समन्वयक म्हणून पंधरा वर्षे, डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयांमध्ये पाच वर्षे, डॉ. एम. एस. जी. इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीजमध्ये 1 वर्ष, सर डॉ. एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे पाच वर्षे व सर डॉ. एम. जी. आय. ई. डी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून दोन वर्षे योगदान दिलेले आहे.

विद्यापीठ पातळीवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत, बिझनेस प्रॅक्टिसेस अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून पंधरा वर्षे, वाणिज्य विद्याशाखेचे सदस्य म्हणून दहा वर्षे, पुनर्रचित अभ्यासक्रम सुकाणू समिती सदस्य पंधरा वर्षे, बोर्ड ऑफ व्होकेशनाल एज्युकेशनचे अध्यक्ष दोन वर्षे, कॅडमिक कौन्सिल सदस्य वर्षे कार्य करून वाणिज्य शिक्षणाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.

पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून त्यांचे पुणे विद्यापीठांतर्गत सहा विद्यार्थी पीएच.डी. झाले आहेत तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दोन विद्यार्थ्यांनी एम. फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या स्टाफ अकॅडमीचे समन्वयक म्हणून सलग पंधरा वर्षे काम केले आहे.

ते विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विषयावर दहा ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर आधारित ‘शिक्षणव्रती’ हा गौरव ग्रंथ 2016 मध्ये प्रकाशित झाला आहे. कार्यशाळा व परिसंवाद यामध्ये सहभाग घेऊन त्यावर आधारित त्यांचे 100 हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत.

गोखले एज्युकेशन आदर्श शिक्षक पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जी. बी. कुलकर्णी अवॉर्ड फॉर कॉमर्स टीचर्स, कै. काकासाहेब सोलापूरकर पुरस्कार, नामदेव शिंपी समाज भूषण पुरस्कार तसेच नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे.

“Skills in Commerce’ या विषयांवर संशोधन करून व अध्यापनामध्ये पद्धतींचा अवलंब करून वाणिज्य शिक्षणाला त्यांनी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. केस स्टडी, प्रोजेक्ट वर्क, ग्रुप डिसकशन, इंडस्ट्रीयल व्हिजिट, सेमिनार, वर्कशॉप आणि तज्ञांची व्याख्याने यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करता येतात हे त्यांनी दाखवले. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरांना हार्दिक शुभेच्छा !!

प्रा. डॉ. उत्तम करमाळकर

- Advertisment -

ताज्या बातम्या