Saturday, May 4, 2024
Homeजळगावसंगणकीकृत 7/12 मधील चुका दुरुस्तीसाठी विशेष शिबीर

संगणकीकृत 7/12 मधील चुका दुरुस्तीसाठी विशेष शिबीर

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात महाराजस्व अभियान-2020 राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत संगणकीकृत 7/12 अद्यावतीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने पाचोरा उपविभागात कामकाज सुरु आहे.

- Advertisement -

जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्रानुसार ज्या संगणकीकृत 7/12 उताऱ्यामध्ये टंकलिखित चुका झालेल्या आहेत. त्या चुका दुरुस्तीसाठी पाचोरा व भडगाव तालुकास्तरावर 8 ते 15 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष शिबीरामध्ये 7/12 दुरुस्तीसाठी नविन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरुन खात्री करणे, तलाठी यांनी कलम 155 चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करुन मान्यता देणे, परिशिष्ट-क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांचे स्वाक्षरी आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे आदि कामे करण्यात येणार आहे.

तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील 7/12 उतारा धारक खातेदारांना महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, ज्या खातेदांराच्या संगणकीकृत 7/12 उताऱ्यामध्ये टंकलेखनाच्या म्हणजेच लेखन प्रमादामुळे चुका झालेल्या आहेत.

अशा चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तरी अशा चुका आपल्या 7/12 उताऱ्यात असतील तर आपण संबधित मंडळ अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून चुकांची दुरुस्ती या कालावधीत करुन घ्यावी. असे राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या