Tuesday, February 18, 2025
Homeनाशिकविनामूल्य शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र साठी विशेष मोहीम

विनामूल्य शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र साठी विशेष मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना विनामूल्य शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र ( free ration card and caste certificate )मिळवून देण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यानुसार अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांनी विनामूल्य शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project ) नाशिक कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका मिळण्यासाठी आवश्यक विहित शुल्क हे न्यूक्लिअस बजेट या योजनेतून प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावरून संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भाव परिस्थितीमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावात बदल करणे, शिधापत्रिका विभक्त करणे यासाठी भरण्यात येणारे शासकीय शुल्क या विशेष मोहिमेंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक या कार्यालयाकडून प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या