पुणे
महाकवी ग.दि.माडगूळकर यांच्या निधनाला येत्या १४ डिसेंबरला ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. या महाकवीचे स्मारक पुण्यात अजूनही झाले नाही. यामुळे राज्यात १४ डिसेंबर रोजी अभिनव जनआंदोलन उभारण्यात आले आहे. राज्यातील अनेक शहरातील कलावंत गदिमांच्या कविता वाचत, गात दिवसभर बसून आंदोलन करणार आहे.
पुणे शहरातील व राज्यातील बहुतांश कलावंतांनी गदिमांच्या स्मारकासाठी अभिनव जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार १४ डिसेंबर २०२० रोजी पुण्यातील कलावंत अलका चित्रपटगृहाच्या चौकात गदिमांच्या कविता वाचत, गात दिवसभर बसणार आहोत. कोरोनामुळे आंदोलनात सर्वांना सहभागी होता येणारही नाही. यामुळे एक योजना केली आहे. शहरातील एकेक कलावंत गदिमांची एक कविता किंवा गाणे गाईल किंवा वाचेल. आंदोलन कोणत्याही घोषणा देत न होता, कोणताही अनुचित प्रकार न करता केवळ गदिमांच्या कविता गात-म्हणत करावयाचे आहे.
आंदोलन सकाळी दहाला सुरू करून रात्री आठला संपेल. हे आंदोलन राज्यातील प्रत्येक शहरात करता येईल, असे प्रदीप निफाडकर (९९२२१२७४९२) यांनी सांगितले.
राज्यातील शहरांमधील संपर्क
नाशिक- अभय ओझरकर
धुळे- प्रा.प्रवीण मोरे
जळगाव- साहेबराव पाटील
नगर – प्रा.रवींद्र काळे
नंदूरबार- राजेंद्रकुमार गावित
सोलापूर- प्रा. दीपक देशपांडे
औरंगाबाद-
लक्ष्मीकांत धोंड
भंडारा,
चंद्रपूर,गोंदिया व गडचिरोली- डाॅ. हरिश्चंद्र बोरकर
अमरावती- राज यावलीकर
नागपूर- सुनील वाडे
सांगली- भीमराव धुळूबुळू
कोल्हापूर- प्रताप पाटील
रत्नागिरी- राजेश आंबर्डेकर
बीड- डाॅ.भास्कर बडे
बुलढाणा- प्रल्हाद कायंदे
वर्धा – भालचंद्र डंभे.
जालना- अरूण घोडे
परभणी – संजय पांडे
संगमनेर- डाॅ. विवेक वाकचौरे
अकोला- निलेश कवडे
उस्मानाबाद- भागवत घेवारे