भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal
रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या विशेष गाडीचे काही थांबे रद्द करण्यात आले आहे. हा बदल भुसावल मंडळांमध्ये लागू राहील.
गाडी क्र.०१०७१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी विशेष गाडी लासलगाव, नांदगाव, नेपानगर या स्थानकांवर. गाडी क्रमांक ०१०९३/०२१९३ डाऊन मुंबई वाराणसी ही गाडी नांदगाव, रावेर, नेपानगर येथे. गाडी क्र. ०३२०२ डाऊन एलटीटी पटना विशेष गाडी ही दि. ६ पासून देवळाली, लासलगाव, नांदगाव, नेपानगर. गाडी क्र. ०१०७७ डाऊन पुणे जम्मू तावी विशेष गाडी नांदगाव येथे. गाडी क्र. ०१०३९ डाऊन कोल्हापूर गोंदिया विशेष गाडी जलंब स्थानकावर. गाडी क्र. ०१४१८/०२०४२ अप नागपूर-पुणे विशेष गाडी चाळीसगाव येथे तर गाडी क्र.०२२२३ डाऊन पुणे अजनी विशेष गाडी नांदुरा या स्थानकांवर थांबणार नाही. गाड्यांचे रद्द करण्यात आलेले स्थानकांबाबतचा बदल प्रवाशांनी लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.