Monday, April 28, 2025
Homeमुख्य बातम्याआषाढीसाठी विशेष रेल्वे गाड्या

आषाढीसाठी विशेष रेल्वे गाड्या

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

आषाढी एकादशीला पंढरपूरला दर्शनाकरिता जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.

- Advertisement -

त्यामध्ये भुसावळ-पंढरपूरसह, नागपूर-मीरज, नागपूर-पंढरपूर, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मीरज-पंढरपूर, मीरज-खुर्दूवाडी या गाड्यांचा समावेश आहे.

नाशकात ‘स्ट्रीट फूड हब’; राज्यात केवळ तीन शहरांची निवड

भुसावळ-पंढरपूर गाडीच्या 28 जूनला दोन फेर्‍या होतील. जळगाव, भुसावळ, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी ही गाडी थांबेल. नागपूर-मीरज गाडीच्या 25 आणि 28 जूनला चार फेर्‍या होतील. ही गाडी जळगाव, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव व अन्य स्थानाकांवर थांबेल.

नाशिक विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा

नागपूर-पंढरपूर आणि नवी अमरावती-पंढरपूर या दोन्ही गाड्यांच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्‍या होतील. भुसावळ, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव आदी स्थानकांवर या गाड्या थांबतील. खामगाव-पंढरपूर या गाडीच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्‍या होतील. ही गाडी भुसावळ, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी थांबेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...