Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वेकडून विशेष गाड्या

रेल्वेकडून विशेष गाड्या

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता त्यांच्या सोयीसाठी रेल्वेने एकूण 380 विशेष रेल्वेगाड्या 80 हजारहून जास्त बोगींसह 6369 फे-या करणार आहेत. गेल्या उन्हाळ्यात 348 रेल्वेगाड्यांमधून 4,599 फे-या झाल्या होत्या. यंदा 1770 जास्त फेर्‍या होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या उन्हाळ्यात विशेष गाड्यांच्या फेर्‍यांची सरासरी संख्या 13.2 होती. यावेळी ती 16.8 आहे. मुंबई-पटना, मुंबई-गोरखपूर, पटना-सिकंदराबाद, पटना-यशवंतपूर, बरौनी-मुजफ्फरपुर, दिल्ली-पटना, नई दिल्ली-कटरा, चंडीगढ़-गोरखपूर, आनंद विहार-पटना, विशाखापट्टनम-पुरी-हावड़ा आदी मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.

380 विशेष गाड्यांच्या 6369 फेर्‍यांमधून जनरलचे 25,794 डबे, तर 55,243 स्लीपर कोच असतील. जनरल डब्यात 100 प्रवाशांची क्षमता आहे तर स्लीपर कोचमध्ये 72 ते 78 प्रवाशी क्षमता आहे. या गाड्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडीशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीशी कनेक्टिविटी वाढणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कर्नाटक क्षेत्रात सेवा देणार्‍या दक्षिण पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वेगाड्यांच्या 779 फेर्‍या केल्या होत्या. यंदा ही संख्या 1790 आहे. गुजरातमध्ये सेवा देणार्‍या पश्चिम रेल्वेने गेल्या उन्हाळ्यात 438 फेर्‍या केल्या होत्या. यंदा ही संख्या 1470 आहे. दक्षिण मध्य रेल्वेने गेल्या उन्हाळ्यात 80 फेर्‍या केल्या होत्या. यंदा त्यांची संख्या 784 आहे. उत्तर भारतात जाणार्‍यांची नेहमी गर्दी असते. हे लक्षात घेऊन उत्तर पश्चिम रेल्वे 400 फेर्‍या करणार आहेत.

अत्याचार करून महिलेची हत्या

तर पूर्व मध्य रेल्वे 380 फेर्‍या करणार आहेत. उत्तर रेल्वेही 324 फेर्‍या करणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने अनाधिकृतपणे सीट पकडणे, एजंटकडून लूटमार अशा प्रकारांमध्ये वाढ होऊन अधिकृत प्रवाशांना त्रास होतो. तो टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या