Saturday, July 27, 2024
Homeजळगावखा.उन्मेष पाटील यांची नेत्रदीप कामगिरी

खा.उन्मेष पाटील यांची नेत्रदीप कामगिरी

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी –

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा खासदार उन्मेश पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून देशभरातील सक्रीय सदस्यांच्या टॉप- १० यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. अशी नेत्रदीपक कामगिरी बजावल्याने खासदार उन्मेश पाटील यांच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

- Advertisement -

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या माहितीनुसार विद्यमान आणि लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला अशा लोकसभेत तब्बल २७० खासदारांमध्ये उन्मेश पाटील यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवत १० वा क्रमांक पटकावला आहे. या लोकसभेत एकूण २७० खासदार आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या संसद सदस्यांनी गेल्या चार वर्षांत नेमकी काय कामगिरी बजावली. याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेस मधून समोर आलेली आहे. सध्याच्या लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या २७० सदस्यांपैकी मंत्रीपद मिळालेल्या तसेच अतिशय अल्प सहभाग घेतलेल्या सदस्यांना वगळून २५० सदस्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता अतिशय मनोरंजक माहितीसमोर आली आहे. यात सदस्यांनी गेल्या चार वर्षात तब्बल ४११०४ प्रश्न विचारले असून ६८५ खासगी विधेयके सादर केली आहेत. यासोबत या सदस्यांनी अंडर हाऊस रूल ३७७ च्या अंतर्गत १९०८ महत्वाचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले आहेत.

या तिन्ही म्हणजेच प्रश्न विधेयके आणि चर्चामधील सहभाग निकषांच्या बाबतीत काही खासदार हे आघाडीवर दिसून आले आहेत. या यादीमध्ये खासदार उन्मेश पाटील यांचा टॉप टेन खासदारांमध्ये समावेश झाला आहे.पीआरएस इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली आहे. यात आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पहिल्या दहापैकी निम्मे म्हणजे पाच सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे तिसर्‍या, शिवसेनेचे खासदार संजय मंडलीक है पाचव्या, खासदार सुनील तटकरे हे सहाव्या, भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील हे आठव्या तर जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे दहाव्या स्थानावर आहेत.

आमदार असल्यापासून कामाची धडाडी-

जळगावचे युवा खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची छाप आधीच उमटवली असतांना सर्वाधीक सक्रीय असणार्या टॉप १० सदस्यांमध्ये त्यांचा झालेला समावेश हा लक्षणीय मानला जात आहे. त्यांनी गेल्या चार वर्षांत ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात ३८० किलोमिटर गिरणा खोर्‍याचा दोन्ही काठावरील गावांमध्ये पायी प्रवास करत गिरणा परिक्रमासह राबविलेले अनेक उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. ते आमदार असतांना शासकीय योजनांची भरवलेली जत्रा ही कौतुकाचा विषय बनली होती. हाच जत्रा पॅटर्नपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून याला मोठी लोकप्रियता लाभली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या