नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगलीचा भाऊ स्नेहाशीष गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहे. रविवारी त्यांची स्पीडबोट समुद्रात पलटून अपघात झाला. पुरी येथील बीचवर वॉटर स्पोर्टस दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. ही घटना शनिवारी संध्याकाळी लाईटहाऊसच्या जवळ घडली. त्यावेळी स्नेहाशीष आणि अर्पिता स्पीडबोट चालवण्याचा आनंद घेत होते.
सौरव गांगुली यांचा भाऊ स्नेहाशीष गांगुली आणि वहिनी अर्पिता गांगुली ओडिशातील पुरी येथे सुट्टीसाठी गेले होते. रविवारी ते समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी दरम्यान स्पीडबोटमध्ये होते, पण समुद्राच्या उग्र लाटांमुळे बोट उलटली आणि ते पाण्यात फेकले गेले. पण, बचावपथकाने घाईने धाव घेत दोघांनाही वाचवले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये स्पीडबोट उलटलेली दिसते आणि बचावपथक प्रयत्न करताना दिसते.
सौरव गांगुली यांचे बंधू स्नेहाशीष आणि त्यांची पत्नी अर्पिता यांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. ‘बोटीमध्ये कमी प्रवासी होते. त्यामुळे ती हलकी होती. समुद्र अतिशय उग्र होता. त्यामुळे बोट उलटली. बोटीची क्षमता १० प्रवाशांची होती. पण पैशांच्या लालसेपोटी चालकाने केवळ ३ ते ४ जण चढल्यावरच बोट सोडली. त्या दिवशी समुद्रात जाणारी ती शेवटची बोट होती. समुद्रात जाताना आम्हाला भीती वाटत होती. आम्ही ती बोट चालकाकडे बोलूनही दाखवली. पण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले,’ अशी माहिती अर्पिता यांनी दिली.
VIDEO | Puri, Odisha: Cricket Association of Bengal (CAB) President and brother of former Indian cricket team captain Sourav Ganguly, Snehasish Ganguly, and his wife Arpita Ganguly were safely rescued after they encountered a horror as their speedboat capsized off Puri coast.… pic.twitter.com/rWCOB4bgYm
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2025
इतक्या मोठ्या लाटा पाहिल्या नव्हत्या
जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा आमच्या जीवनात इतक्या मोठ्या लाटा पाहिल्या नव्हत्या. १० मजली इमारती इतक्या ऊंच लाटा होत्या. जर त्या नावेत १० लोक असते तर तिचे संतुलन बिघडले नसते. मात्र, कमी लोक असल्याने ती बोट पलटली. त्या बोटीखाली सापडलो होतो, त्यातील डिझेल सांडले होते. जर जीवरक्षक जवानांनी वाचवले नसते तर आम्ही वाचलो नसतो, असे अर्पिता म्हणाली. जवळपास १५-२० लोक आले आणि त्यातील एका गार्डने माझ्या पायाला पकडून वाचवले. अजूनही त्या धक्क्यात आहे, असे म्हणत अर्पिता रडू लागल्या. या घटनेनंतर झोप लागत नसल्याचे त्या म्हणाल्या.
बोट ऑपरेटवर कारवाईची मागणी
अर्पिता गांगुली यांनी संबंधित बोट ऑपरेटरांवर कारवाईची मागणी केली असून, अशा वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. “पुरी समुद्रकिनाऱ्यावर समुद्र अतिशय खवळलेला असतो. मी कोलकात्याला परत गेल्यावर पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून येथे वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालण्याची मागणी करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा