Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याइंदूर-मनमाड रेल्वेला गती?

इंदूर-मनमाड रेल्वेला गती?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनंतरही रखडलेली इंदूर-मनमाड रेल्वे योजना आता प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अनेक वर्षांच्या अडथळ्यांनंतर इंदूर-मनमाड रेल्वे गतीमान होण्याची आशा बळावली आहे. या रेल्वे मार्गामुळे राज्यातील धुळे व नांशिक जिल्हातील अनेक गावांच्या उद्योग व्यापाराला गती मिळण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून इंदूर- मनमाड रेल्वेची फक्त चर्चाच ऐकण्यात आली आहे. इंदूर-मनमाड मार्ग मुंबईचे अंतर कमी करणारे आहे. दूरवरच्या प्रवासातील 12 ते 14 तासांची बचत करणारा ठरणार आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी नुकतीच इंदूरला भेट दिली. त्यांनी अचानक नियोजनात नसताना इंदूर रेल्वे स्थानकाची पहाणी केली व समस्या जाणून घेतल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या कामाची माहिती दिली. खासदारांकडून होत असलेले प्रयत्न फळाला येत असल्याचे दिसत आहे. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर खासदारांनी इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले. वैष्णव यांनी प्रकल्पाशी संबंधित संपूर्ण अहवाल 2 दिवसांत दिल्लीला पाठवण्याचे निर्देश खासदारांना दिले. तसेच या कामाला गती देत तातडीने मंजूरी करण्याचे आश्वासन देत सविस्तर माहिती पाठवण्याची विनंती केल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.

रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

2002 मध्ये माजी रेल्वे मंत्री नितीशकुमार यांनी इंदूर-महू-धामनोद-सेंदवा-शिरपूर-नरडाणा-धुळे-मालेगाव-मनमाड मार्गाचे सर्वेक्षण दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. 2009 मधील सुधारित सर्वेक्षणानुसार 10.31 टक्के रिटर्न ऑन रेव्हेन्यू (आरओआर)ची किंमत 1,450.51 कोटी रुपये होती. परंतु, योजनेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळू शकली नाही. कारण परतावा 14 टक्केंपेक्षा कमी होता.प्रकल्प सुरू करण्यासाठी बेंचमार्क सेट करणार्‍या तज्ज्ञांनी या मार्गाने 21टक्केपर्यंत आरओआर मिळू शकतो असा निष्कर्ष दिला होता. त्यामुळे हे प्रकरण रखडलेले होते.त्याबाबतही चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले.

अंतर होणार कमी

या नवीन मार्गामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतही जवळ येईल. प्रत्यक्षात पश्चिम रेल्वेवर, अवंतिका एक्स्प्रेस मुंबई ते इंदूरला 830 किमी अंतर कापते. इंदूर-मनमाड मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर हे अंतर 580 किमीवर येईल. यामुळे 250 किमीचे अंतर कमी होणार आहे. जम्मू तवी-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस इटारसी आणि नागपूर मार्गे 3,141 किमी धावते. जर ट्रेनने दिल्ली-नागदा-इंदूर-धुळे-मनमाड-रत्नागिरी-तिरुवनंतपुरम या मार्गावर प्रवास केला तर अंतर केवळ 2461 कि.मी भरणार आहे. त्यामुळे 680 किमीने अंतर कमी होणार आहे. त्यामुळे अर्थात प्रवासाचा वेळ 12-14 ने कमी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या