Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्या'पुण्याहून पुणतांबा'! स्पाईस जेट विमानसेवेचा अजब कारभार; वाचा सविस्तर

‘पुण्याहून पुणतांबा’! स्पाईस जेट विमानसेवेचा अजब कारभार; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

अलायन्स एअर व स्टार एअरने 1 तारखेपासून नाशिक विमानतळावरुन विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या पाठोपाठ उरलेल्या एकमेव स्पाईस जेट विमान कंपनी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नागरीकांना मन:स्ताप देण्याचा प्रकार सुरु झाल्याने सक्षमपणे चालणारी नाशिकची विमान सेवा ठप्प करण्याचे प्रकार होत आहेत काय? असा सवाल उद्योजक व नागरिक उपस्थित करीत आहेत…

दिल्लीच्या 166 प्रवाशांचे लगेज रखडल्याने त्यांना झालेला मनस्ताप ताजा असतानाच शुक्रवारी स्पाईसजेट विमान कंपनीच्या माध्यमातून सकाळी 8.10 वा. हैद्राबादला जाण्यासाठी दिंडोरी येथील उमेश बैरागी यांनी विमानाची 9 तिकीट बूक केली होती.

या विमानात जाण्यासाठी सकाळी 7.10 मिनिटांनी विमानतळावर पोहोचल्यानंतर अधिकार्‍यांनी 7 वाजता प्रवेश बंद झाल्याचे सांगून, आत जाऊ देण्यास नकार दिला. दरम्यान आलेल्या इतर 6 प्रवाशांना त्यांच्या समक्ष प्रवेश दिला. मात्र बैरागी यांना रोखूनच धरले.

 दोघांमध्ये थोडी बाचाबाची झाल्यानंतर व्यवस्थापक रवी यांनी तीन प्रवाशांना पाठवण्यास तयारी दर्शवली. त्यासह बैरागी यांनी नकार दिल्याने अखेर त्यांना शिर्डीहून दिल्ली व दिल्लीहून हैद्राबाद असा द्रविडी प्राणायाम करायला लावला.

या प्रवासामुळे सकाळी 9.45 ला हैद्राबादला पोहचणारे बैरागी कुटूंबीय आता दिल्ली वारी करीत रात्री 12.30 ला पोहोचले. दरम्यान नाशिकहुन शिर्डी प्रवासाचा खर्च व मनस्ताप मात्र त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवणार ठरला.

दोनच दिवसांपूर्वी ओझर विमानतळावर दिल्लीसाठी विमान येऊनही ’टेक ऑफ’ साठी दीड तास विलंब होत असल्याने आधीच वैतागलेल्या प्रवाशांना स्पाईसजेटच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा फटका बसला.

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; दोन बसेसची धडक

ओझरहून विमानाने टेकऑफ तर घेतले. मात्र दिल्ली विमानतळावर गेल्यानंतर  विमानातील 166 प्रवाशांचे सामान ओझर विमानतळावरच राहिल्याची बाब समोर आली.यानंतर प्रवाशांनी व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला.अखेर शिर्डीमार्गे हे सामान दिल्लीत पोहचविण्यात आले. त्यामुळे पर्यटकांचे त्या दिवसाचे नियोजन पूरते कोलमडल्याचे दिसून आले.  स्पाईस जेटच्या या दिवाळी धमाक्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नाशिकच्या विमानसेवेला कर्मचार्‍यांच्या माध्यमातून ग्रहण लावण्याचे हे प्रकार होत आहेत काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोन दिवासंपूर्वी दिल्ली विमानातील 166  प्रवाश्यांचे लगेज नाशिकलाच राहते काय? आज प्रवाशाला शिर्डीहून हैद्राबादला पाठवतात काय? या चुका गंभीर आहेत. याबद्दल स्पाईसजेट विमान कंपनीच्या वरिष्ठांशी दिल्लीत बोलणार असून नाशिकची विमानसेवा सक्षम करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे.

– भारती पवार (केंद्रिय राज्य मंत्री)

आम्ही वेळेत येऊनही आम्हाला विमानतळावर प्रवेशाला मनाई करण्यात आली. सर्व पूर्तता करुनही सामान्यांना त्रास दिला जात आहे. सिझनमध्ये महागात तिकीट विकणारे रॅकेट तयार झाले आहे काय?

– उमेश बैरागी (प्रवासी, दिंडोरी)

शॉर्टसर्किटमुळे एसटीला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

- Advertisment -

ताज्या बातम्या