Monday, April 28, 2025
Homeक्रीडाफिरकीच्या जादुगाराची पुन्हा ‘एन्ट्री’

फिरकीच्या जादुगाराची पुन्हा ‘एन्ट्री’

नवी दिल्ली – New Delhi

आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने लीगच्या आगामी हंगामासाठी आपला माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची ब्रँड अंम्बेसेडर आणि मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली आहे.

- Advertisement -

फ्रेंचायझीने रविवारी निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली. एक सल्लागार म्हणून वॉर्न मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅक्डोनाल्डबरोबर काम करेल. शिवाय, वॉर्न राजस्थानच्या व्यवस्थापनासह आंतरराष्ट्रीय फॅनबेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. आपल्या दुहेरी भूमिकेबद्दल वॉर्न म्हणाला, ‘राजस्थानबरोबर पुन्हा जोडलो गेल्याने चांगले झाले आहे. हा माझा संघ आणि कुटुंब आहे. फ्रेंचायझीसह सर्व क्षेत्रात कार्य करणे चांगले होईल. आम्ही जागतिक स्तरावर एक चांगला संघ होण्यासाठी काम केले, आहे.

या हंगामात: अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि झुबिन बारुचा यांच्यासोबत मी संघाबरोबर जोडलो गेल्याने मला आनंद झाला आहे. मला आशा आहे, की आमचा हंगाम यशस्वी होईल आणि येत्या काही महिन्यांत आम्ही चांगले यश मिळवू शकू.

कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह ही तीन यूएई शहरे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत लीगचे आयोजन करतील. गतविजेत्या मुंबईचा आणि लीगचा पहिला सामना 19 नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...